नाशिक महानगरपालिका सतर्क :आपत्तीजन्य परिस्थितीत ‘या’क्रमांकावर संपर्क साधा
🌧️ नाशिक शहरासाठी महत्त्वाची सूचना – मनपाचे आवाहन
नाशिक दिनांक – २२ मे २०२५ – Nashik Emergency Helpline Number नाशिकमध्ये जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर व अवकाळी पावसामुळे संभाव्य वादळे, अतिवृष्टी, पूर, झाडे कोसळणे, घरांची पडझड यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता नाशिक महानगरपालिका व अग्निशमन विभाग पूर्णतः २४ तास अॅक्शन मोडवर सज्ज राहणार आहेत.
🛑 आपत्तीजन्य स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:(Nashik Emergency Helpline Number)
📞 आपत्कालीन क्रमांक: 0253-2571872
👩💼 महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांचे आदेश:
सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे. अग्निशमन विभाग, बांधकाम, आरोग्य, जलपुरवठा, विद्युत, उद्यान विभाग यांना विशेष दक्षतेचे निर्देश.
🔹 आपत्तीजन्य स्थितीतील कृती आराखडा (SOP):
अ) अतिवृष्टीमुळे घरे पडल्यास
✅ घटनास्थळी त्वरित मदत
✅ बांधकाम विभागास माहिती
✅ अडकलेल्यांची रुग्णालयात व्यवस्था
✅ वरिष्ठांना त्वरित माहिती देणे
ब) पूरस्थितीमध्ये कार्यवाही
✅ गंगापूर धरणाची दर दोन तासांनी माहिती
✅ नदी पातळी वाढल्यास सतर्कतेचा इशारा
✅ पूरग्रस्त भागात नागरिकांचे स्थलांतर
✅ अडकलेल्यांची सुटका व मृतदेह विल्हेवाट
क) वादळामुळे झाडे कोसळल्यास
✅ धोकादायक झाडे कापणे
✅ वाहतूक सुरळीत करणे
✅ वृक्ष अधिकारी व संबंधितांना लेखी माहिती
ड) वाहने व यंत्रसामुग्री सज्ज ठेवणे
✅ अग्निशमन वाहनांची देखभाल
✅ आवश्यक दुरुस्ती कार्यशाळेमार्फत
✅ पावसाळी गटारे, चेंबर वेळेवर साफसफाई
👥 वरिष्ठ अधिकारी व बैठक:
अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी सहा विभागांच्या अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठका घेऊन निर्देश दिले.
बैठकीस उपस्थित:
➡️ स्मिता झगडे (अतिरिक्त आयुक्त)
➡️ नितीन पवार (उपआयुक्त)
➡️ अश्विनी गायकवाड, संजय अग्रवाल, अविनाश धनाइत, डॉ. तानाजी चव्हाण, विवेक भदाणे
➡️ सर्व विभाग प्रमुख
📌 नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहून अधिकृत माहितीचा आधार घ्यावा व वेळप्रसंगी मदतीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.