नाशिक- नाशिक महानगर पालिकेचे माजी नगरसेवक नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे माजी संचालक सतीश मंडालेचा आज यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. आज सायंकाळी ४:३० वाजता त्यांची अंतयात्रा वर्धमान सोसायटी येथून निघणार आहे. नाशिकरोडच्या देवळालीगांव येथिल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
१९९२ साली ते नाशिक महानगर पालिकेत नागरी विकास आघाडी कडून वार्ड क्रमांक ५२ मधून निवडून आले होते. त्यांनी अनेक वर्ष नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली होती.संघटन कौशल्य तसेच सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव म्हणून सर्वदूर परिचित होते
नाशिकरोड येथील जैन श्रावक संघाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मंडालेचा यांचे लहान बंधू व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडालेचा तसेच उद्योजक मनोज मंडालेचा यांचे ते मोठे बंधू होते यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,तीन भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.