नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात खळबळजनक माहिती उघड!
पंचतारांकित हॉटेल्स, ७० हून अधिक नेते-अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
📍नाशिक, दि. २१ जुलै २०२५ – Nashik Honey Trap Case नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पंचतारांकित हॉटेल्समधून नेते,अधिकारी, मंत्री आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
🔍 ३ कोटींची खंडणी, नंतर मागणी १० कोटींवर!(Nashik Honey Trap Case)
एक वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला. त्याच्याकडून सुरुवातीला ३ कोटी रुपये उकळले गेले, त्यानंतर पुन्हा १० कोटींची मागणी झाल्याने अधिकारी हादरला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार या महिला सध्या मुंबईत स्थायिक असून तिचे अनेक मंत्र्यांशीही संबंध असल्याची चर्चा आहे.
🚨 प्रफुल्ल लोढा अटकेत, गंभीर आरोप
या प्रकरणात प्रफुल्ल लोढा या कथित समाजसेवकावर पॉक्सो, बलात्कार, खंडणी, आणि हनी ट्रॅपसंबंधी गंभीर गुन्हे साकीनाका व अंधेरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. १६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोप आहे. लोढाला ५ जुलै रोजी अटक झाली आहे.
🧾 राजकीय नाते – महाजन आणि लोढा यांचा फोटो वादात
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
प्रफुल्ल लोढा आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. या फोटोच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी म्हटले, “मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटं बोलून दिशाभूल केली. हा फोटोच सत्य दाखवेल.”
🎥 “सीडी आमच्याकडे आहे” – विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची संपूर्ण सीडी त्यांच्या कडे आहे. ते म्हणाले, “ही सीडी इतकी मोठी आहे की ती फक्त खास निमंत्रित लोकांनाच दाखवू शकतो. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांची नावे आहेत.”
🔴 नाशिक, ठाणे आणि मुंबई – हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू
नेते नाना पटोले यांनी विधानसभेत सांगितले की, हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राचे गुप्त दस्तऐवज असामाजिक तत्त्वांच्या हाती लागले आहेत, जे राज्यासाठी धोका ठरू शकते. त्यांनी सरकारकडे पेन ड्राईव्ह सुपूर्त न केल्याची कारणे दिली – “अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील.”
[…] […]