नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२६-२८ –शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर
३१ ऑक्टोबर २०२६ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला भव्य सुरुवात, २४ जुलै २०२८ रोजी होणार समारोप
नाशिक, १ जून २०२५ – Nashik Kumbh Mela नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पार पडणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Nashik Kumbh Mela 2026-2028) शाही स्नानाचे संभाव्य दिवस जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड येथे ध्वजारोहणाने सुरू होणार असून, तो २४ जुलै २०२८ पर्यंत सुरू राहणार आहे.
या काळात एकूण ४२ ते ४५ पर्वस्नानाचे आयोजन होणार आहे. यात प्रमुख शाही स्नानाचे दिवस पुढीलप्रमाणे:(Nashik Kumbh Mela)
🕉️ शाही स्नान तारखा:
२ ऑगस्ट २०२७ (सोमवती अमावस्या) – पहिले शाही स्नान
३१ ऑगस्ट २०२७ (श्रावण वद्य अमावस्या) – महाकुंभ स्नान (सूर्य, चंद्र आणि गुरू सिंह राशीत)
११ सप्टेंबर २०२७ (भाद्रपद शुद्ध एकादशी) – अमृत स्नान
🛕 कुंभ मेळा इतर महत्त्वाच्या तारखा:
२४ जुलै २०२७ – आखाड्यांचे ध्वजारोहण (आषाढ कृष्ण पंचमी)
२९ जुलै २०२७ – नगर प्रदक्षिणा (एकादशी)
🔭 गुरूचे राशी प्रवास:
३१/१०/२०२६ – सिंह राशीत प्रवेश
२४/०१/२०२७ – वक्री होऊन कर्क राशीत
२५/०६/२०२७ – पुन्हा सिंह राशीत
२६/११/२०२७ – कन्या राशीत
२८/०२/२०२८ – पुन्हा सिंह राशीत
२४/०७/२०२८ – कन्या राशीत प्रवेश
यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी असून, गुरू ग्रह वक्री होऊन तीन राशींमध्ये भ्रमण करणार आहे – सिंह, कर्क आणि कन्या. त्यामुळे या कुंभमेळ्याला धार्मिक, खगोलीय आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
[…] […]