नाशिक जिल्हा एलईडी स्क्रीन असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

0

नाशिक, दि. १८ सप्टेंबर २०२५ Nashik LED Screen Association नाशिक जिल्हा एलईडी स्क्रीन असोसिएशनची आढावा बैठक आशादीप बँक्वेट हॉल, बळी मंदिर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाण्याबरोबरच ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी ठोस कार्ययोजना आखण्यात आली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एलईडी स्क्रीन व्यवसाय एकसमान दरांवर उपलब्ध व्हावा, यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीदरम्यान व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने राबवणे, सदस्यांमध्ये एकजूट निर्माण करणे आणि ग्राहकांचा विश्वास वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी संघटनेची भूमिका अधिक प्रभावी करण्याचे सर्व सदस्यांनी ठरविले.

नवीन कार्यकारिणी जाहीर(Nashik LED Screen Association)

या बैठकीत संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार

अध्यक्ष : अर्जुन नावळे

उपाध्यक्ष : उमेश पवार

खजिनदार : निलेश गणोरे

उपखजिनदार : शुभम जाधव

सचिव : राजू गरड

उपसचिव : निलेश सानप

सल्लागार मंडळ : अमर तांबे, राजू भोकरे, विजू भोई, शिवा देवरे, अमित कारवा

सदस्य : भाऊसाहेब डावरे, जितू राजोळे, धीरज करपे

नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पारदर्शकपणे पार पाडून संघटनेचा कारभार अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संघटनेची पुढील दिशा

बैठकीत चर्चेनुसार, पुढील काळात ग्राहकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सेवा पद्धतीत सुधारणा, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसायासाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व एलईडी स्क्रीन व्यावसायिकांना एकत्र आणून परस्पर सहकार्याच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार आणि दर्जेदार सेवा हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख एलईडी स्क्रीन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!