नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय बालिकेचा मृत्यू; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

0

नाशिक, दि. २१ जून २०२५ – Nashik Leopard Attack नाशिक जिल्ह्यातील गोंदे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका साडेतीन वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आईच्या डोळ्यादेखत ही लहानगी बिबट्याने उचलून नेल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मृत बालिकेचे नाव जान्हवी सुरेश मेंगाळ (वय – साडेतीन वर्षे) असे आहे. जान्हवी तिच्या आईसोबत शेतातून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. गोंदेफाटा शिवाराजवळील मक्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवून जान्हवीला जबड्यात पकडले आणि शेजारच्या ज्वारीच्या शेतात नेले.

आई व शेजारी असलेल्या मजुरांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याने बालिकेला सोडून पळ काढला. मात्र, जान्हवी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने सिन्नरमधील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू होण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

बिबट्यांचा वाढता वावर – प्रशासन उदासीन(Nashik Leopard Attack)
गेल्या काही वर्षांपासून गोंदे परिसरासह संपूर्ण सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाळीव जनावरांपासून ते लहान मुलांपर्यंत बिबटे थेट हल्ला करत आहेत. यापूर्वी नऊ महिन्यांपूर्वीही याच भागात आठ वर्षीय कुणाल रवींद्र तांबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

स्थानिक नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी केली होती. मात्र, कारवाईची प्रतीक्षा आजही सुरूच आहे. त्यामुळे लोक बिबट्याच्या दहशतीखाली जगण्यास मजबूर झाले आहेत.

नागरिकांची मागणी:
तातडीने पिंजरे लावावेत
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हिजन कॅमेरे बसवावेत
मानवहानी टाळण्यासाठी संवेदनशील भागात गस्त वाढवावी
पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!