Nashik:महाराष्ट्र Vs बडोदा रणजी सामना :ऋतुराज गायकवाड,कृणाल पंड्याचा खेळ बघण्याची संधी
२३ ते २६ जानेवारी दरम्यान गोल्फ क्लब मैदानावर आयोजन :बडोदा संघाचे नाशिक मध्ये आगमन
नाशिक,दि,२० जानेवारी २०२५ – नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून नाशिकरांना ऋतुराज गायकवाड,कृणाल पंड्याचा खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यासाठी बडोदा संघाचे आज नाशिकमध्ये आगमन झाले आहे.
या सामन्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदसिद्ध अध्यक्ष मा. जलज शर्मा यांनी आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबला भेट दिली.या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी रणजी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल , दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि सामन्यासाठी त्यांचेकडून संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली. पाहणी प्रसंगी समवेत नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सहसचिव चंद्रशेखर दंदणे, सेक्रेटरी समीर रकटे पदाधिकारी बाळासाहेब मंडलिक, फय्याज गंजीफ्रॉकवाला तरुण गुप्ता व राजू आहेर आदी उपस्थित होते.
बडोदा क्रिकेट संघाचे नाशिक मध्ये आगमन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.या सामन्यासाठी आजच बडोदा क्रिकेट संघ नाशिक मध्ये दाखल झाला आहे.
बडोदा क्रिकेट संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :
१- कृणाल पंड्या – कर्णधार
२- विष्णू सोळंकी – उपकर्णधार
३- जोस्निल सिंग
४- शिवालिक शर्मा
५- शाश्वत रावत
६- मितेश पटेल -यष्टीरक्षक
७- अतित सेठ
८- राज लिम्बाणी
९- महेश पिठीया
१०- भार्गव भट
११- आकाश सिंग
१२- निनाद राठवा
१३- अभिमन्यू सिंग राजपूत
१४- लुकमान मेरीवाला
१५- अक्षय मोरे – यष्टीरक्षक
१६- नित्या पंड्या
१७- सुकीर्त पांडे
१८-बाबासाफी पठाण
मुख्य प्रशिक्षक – मुकुंद परमार , गोलंदाजी प्रशिक्षक – अरविंद श्रीनाथ , क्षेत्ररक्षण प्रशिक्षक – हिमांशू जाधव
आणि संघ व्यवस्थापक – धर्मेद्र ( राजू ) आरोठे.
बडोदा संघ दि २१ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता अनंत कान्हेरे मैदानावर सराव करणार आहे.