ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळाचा ‘विश्वविक्रम’ वंडर बुक रेकॉर्डमध्ये नोंद

रुपेरी काव्यहोत्रा च्या माध्यमातून सलग २५ तास कवितांचे सादरीकरण :६८० कवीने  स्वरचित कविता केल्या सादर 

0

नाशिक.दि, २० जानेवारी २०२५ –ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेच्या वतीने बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुपेरी काव्यहोत्राचा मराठी कविता वाचनाच्या सलग  २५ तास स्वरचित मराठी कविता वाचनात 680 कवींनी सहभाग घेऊन  विश्वविक्रमाचा वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचा समारोप सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर गुरुजी रुग्णालयचे संस्थापक प्रकाश पाठक,अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक  अथर्व शुक्ल,कौशल घोडके, शिक्षण अधिकारी बी.टी.पाटील,कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी,नितीन ठाकरे,ईश्वर चव्हाण,कवयित्री अलका कुलकर्णी,नंदकिशोर ठोंबरे, कवी डॉ.चिदानंद फाळके विनायक रानडे ,या समवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष माननीय ल .जि. उगांवकर ,सचिव गोपाळ पाटील  सहसचिव डॉ.अंजली पाटील,संचालक छाया निखाडे,अनिल भंडारी, अजय ब्रम्हेचा,परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी तसेच विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार व कल्पना चव्हाण यांनी आपल्या केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!