जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न

0

नाशिक,दि.२८ जुलै २०२३ –नाशिक जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच  चिन्मय आश्रम, नाशिक येथे पार पडली. प्रारंभी त्रिवार ओंकार, प्रार्थना घेऊन व दीप प्रज्वलन करून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदीप चिंचोलीकर, उपाध्यक्ष दीपक उपासनी,  सचिव योगाचार्य प्रा. पिराजी नरवाडे,  चिन्मय आश्रमाचे विश्वस्त योगाचार्य प्रा. जिवराम गावले आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

ही स्पर्धा योगासनाच्या चार प्रकार व सहा वयोगटानुसार घेण्यात आली.नऊ वर्षांच्या मुला-मुली पासून ते पन्नास वर्षांच्या पुरुष-महिला योगासनपटूनी भाग घेतला. ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक योगासन, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर अशा चार प्रकारात स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवत चुरस निर्माण केली.

अगदी लहान असलेल्या नऊ वर्षांच्या मुला-मुलींनी आर्टिस्टिक योगासन वरिदमिक योगासन प्रकारात संगीताच्या तालावर अतिशय लयबद्धतेने योगासने लीलया करत उपस्थितांची वाहवा मिळवली.ट्रॅडिशनल योगासनासह इतर प्रकारात अनुभवी योगासनपटूनी अतिशय अवघड वाटणारी योगासने सहजपणे करत प्रेक्षकांची मन जिंकली प्रत्येक गटातून प्रथम तीन विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,पदकांसह प्रमाणपत्र देण्यात आले.हे स्पर्धक राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी नाशिकचे प्रतिनिधित्व करतील.उर्वरित स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
गटनिहाय विजेते:
ट्रॅडिशनल योगासन:  
• ९ ते १४ वयोगट(मुली) :
१) नेहा सतिश पवार
२) रूनझुन बाच्छव फटांगरे
३) खुशी दिलीप जैसवानी•

९ ते १४ वयोगट(मुले) :
१) पार्थ अर्जुन खताळ
२) प्रेम सुनील शेलार
३)अनय महेश शिंदे

• १४ ते १८ वयोगट(मुली) :
१) समृद्धी गोपाल गोरे
२) प्राजक्ता राजू पगारे
३) तनिष्का राहुल कट्यारे

• १४ ते १८ वयोगट(मुले) :
१) पवन शरद अहिरे
२) रोहित प्रमोद कदम
३) सार्थक रवी पवार•

१८ ते २८ वयोगट(मुली) :
१) पूनम किशोर इंगळे
२) किर्ती राजेंद्र बोरसे
३) रितिका नंदकिशोर झाल्टे

• १८ ते २८ वयोगट(मुले) :
१) आशय निलेश हडकर
२) आशुतोष संजय राशिनकर
३) ओंकार पोपट चव्हाण

• २८ ते ३५ वयोगट(महिला) :
१) शुभांगी विवेक निंबालकर

• २८ ते ३५ वयोगट(पुरुष) :
१) भूषण जिभाऊ आहिरे

• ३५ ते ४५ वयोगट(महिला) :
१) कांचन भानुदास उफाडे
२) सुलभा बाच्छव फटांगरे
३) स्वाती उदय बऱ्हाटे

• ३५ ते ४५ वयोगट(पुरुष) :
१) लोकेश दिलीप सोनी
२) सचिन नानासाहेब कुमावत•

४५ ते ५५ वयोगट(महिला) :
१) नलिनी मधुकर कड
२) रेखा विजय पवार

*आर्टिस्टिक योगासन (सिंगल):
• ९ ते १४ वयोगट(मुली) :
१) नेहा सतिश पवार
२) रूनझुन बाच्छव फटांगरे

• ९ ते १४ वयोगट(मुले) :
१) आर्यन भाऊसाहेब वाकचौरे

• १४ ते १८ वयोगट(मुली) :
१) तनिष्का राहुल कट्यारे
२) समृद्धी गोपाल गोरे
३) प्राजक्ता राजू पगारे

• १८ ते २८ वयोगट(मुले):
१) आशुतोष संजय राशिनकर

आर्टिस्टिक योगासन (पेअर):
• ९ ते १४ वयोगट(मुली) :
१) मृण्मयी मिलिंद दिक्षित
२) जान्हवी सुरेश धिवरे

• ९ ते १४ वयोगट(मुले) :
१) अनय महेश शिंदे

रिदमिक योगासन (पेअर):
• ९ ते १४ वयोगट(मुले) :
१) पार्थ अर्जून खताळ
२) निशांत जगदीश जोशी

• १४ ते १८ वयोगट(मुले) :
१) रोहित प्रमोद कदम
२) पवन शरद अहिरे

• १८ ते २८ वयोगट(मुली) :
१) पूनम किशोर इंगळे
२) किर्ती राजेंद्र बोरसे

या स्पर्धेसाठी जिवराम गावले यांनी चिन्मय आश्रमाची जागा दिल्याबद्दल आणि रुपाली शेट्टी यांनी मोफत भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता असोसिएशनचे कोषाध्यक्ष मंदार भागवत,सहसचिव सुनील ढमाले व राहुल येवला यांनी परिश्रम घेतले.शर्मिला डोंगरे,शुभांगी निंबाळकर ,रुपाली शेट्टी,सुरेखा दिवेकर,हर्षाली पवार,अनुष्का खळदकर, अर्चना दिघे,कांचन वालझडे,राहुल चौधरी, स्वाती मुळे, रमेश जगताप आदींनी पंच म्हणून काम पाहिले.चेतन वाघ यांनी सूत्र संचलन केले व राहुल येवला यांनी आभार मानले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!