नाशिक,दि.२८ जुलै २०२३ – हार्मनी आर्ट गॅलरी आणि राजा पाटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक बार फिर रफी’ एकल व युगुलगीतांचा संगीतमय मैफिली आयोजन करण्यात आले आहे.
गायनकला, वादनकला, मूर्तिकला आणि चित्रकला अशा सर्व कलांच्या मोफत प्रदर्शनांचे आयोजन करणाऱ्या “हार्मनी आर्ट गॅलरी”तर्फे ५०१ व्या कार्यक्रमानिमित्त नामदेव प्रासाद,पाटील गल्ली, विद्या विकास चौक, गंगापूर रोड येथे या वेळी रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सायं.६ वा.या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
“एकबार फिर..रफी”या स्व.मोहम्मद रफी यांच्या एकल व युगुलगीतांच्या मैफिली चे नाशिककर रसिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आले आहे. या श्रध्दांजलीपर कार्यक्रमात इतर ठिकाणी न ऐकलेली पण प्रसिध्द अशी गाणी सौ.उषा पाटेकर, जयंत पाटेकर,डॉ. मनोज वावरे ,सौ.मयुरा खोले आणि सतीश कोठेकर हे सादर करणार आहेत.सर्व रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक राजा पाटेकर यांनी केले आहे.