नाशिक शहर हद्दीत पुन्हा सापडला अंमली पदार्थांचा मोठा साठा

0

नाशिक,दि, ७ ऑक्टोबर २०२३ – नाशिक शहर हद्दीत पुन्हा अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडला असल्याची माहिती समोर येत आहे.दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी शिंदे एमआयडीसी परिसरामध्ये मोठी कारवाई केली होती.त्यानंतर नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे.३०० कोटीहून अधिक रकमेचा हा साठा असल्याची माहिती देण्यात येत आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्स आणि ड्रग्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. नाशिकमधील शिंदे एमआयडीसीमध्ये परिसरात हा साठा मोठा सापडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिक पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याच भागामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहर ड्रग्जच्या विळख्यात तर सापडलं नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय.या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्स आणि ड्रग्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पोलिसांनी जप्त केला.नाशिकमधील शिंदे एमआयडीसीमध्ये परिसरात हा साठा मोठा सापडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुरु असलेल्या या ड्रग्जच्या कारवाईमध्ये अनेक मोठे खुलासे होते आहेत.मुंबई पोलिसांनंतर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणत्या कारवाया होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या कारवाई वेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, सुवर्णा हांडोरे व कर्मचारी उपस्थित होते.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.