नाशिक,दि,२० फेब्रुवारी २०२४ –नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनचे दुय्यम निरीक्षक अशोक नजन यांनी ऑन ड्युटी असतानाच आज सकाळी दहा वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यातच पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
अशोक नजन हे अंबड पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षक पदावर कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे आज सकाळी पोलीस ठाण्यात आले. ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. नजन यांनी पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ते मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले. पोलीस याबाबत तपास करत आहेत.