नाशिक दिनांक:30 मे 2025- Nashik Power Cut News महावितरणच्या नाशिक शहर विभाग क्र. २ अंतर्गत येणाऱ्या शिवाजीवाडी उपकेंद्रामध्ये उच्च क्षमतेचा नवीन रोहित्र बसविण्याचे काम होणार आहे. त्यामुळे शनिवार, 31 मे 2025 रोजी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
शिवाजीवाडी उपकेंद्रात रोहित्र क्षमतावाढ – इंदिरा नगर भागातील वीजपुरवठा बंद
प्रभावित भाग:( Nashik Power Cut News)
दिपाली नगर वाहिनी: दिपाली नगर, विनय नगर, गणपती नगर, काळे मळा, सुचिता नगर, परब नगर, बापू बंगला, साईनाथ नगर
भारत नगर वाहिनी: भारत नगर, शिवाजीवाडी, ममता नगर, रहनुमा नगर, खोडे नगर, गणेश नगर, वडाळा गाव
शनी मंदिर वाहिनी: शनी मंदिर, आदर्श कॉलनी, कमोद नगर, गीतांजली कॉलनी
कल्पतरू नगर वाहिनी: अशोका मार्ग, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, गोदावरी नगर, रविशंकर मार्ग
33 केव्ही वाहिनी: अशोका हॉस्पिटल परिसर व क्युरी मानवता हॉस्पिटल
👉 काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔧 द्वारका व राणेनगर विभागात देखभाल-दुरुस्ती – वीजबंदीची घोषणा
राणेनगर शाखा:
पाथर्डी उपकेंद्र – ११ केव्ही राजीव नगर व इंदिरानगर वाहिनीवर काम
वेळ: ३१ मे, सकाळी ९ ते सायंकाळी ६
प्रभावित भाग: अशोका मार्ग, कल्पतरू नगर लेन 1-3, गणेश बाबा नगर, रविशंकर मार्ग, पायनर हॉस्पिटल, सुविचार हॉस्पिटल
द्वारका शाखा:
टाकळी उपकेंद्र – ११ केव्ही उत्तरा नगर व पुणे रोड वाहिनीवर काम
प्रभावित भाग: भारत एन्क्लेव्ह, सराफ नगर, आदित्य हॉल परिसर, कैलास नगर, सिमेन्स कॉलनी, सुदर्शन लॉन्स, वनवैभव कॉलनी, राजीव नगर, श्रद्धा विहार, इंदिरानगर
👉 योग्य दाब व अखंड वीजसेवेसाठी ही कामे आवश्यक असून वेळेत पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.
⚠️ ग्राहकांना सूचना:
जीवनावश्यक कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करावीत मोबाईल, पॉवर बँक, इन्व्हर्टर यांची तयारी ठेवावी,संयम व सहकार्य राखावे