देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता सिडको उपविभागातील वीज पुरवठा १५ मे ते १८ मे रोजी बंद  

0

नाशिक,दि. १४ मे २०२४- महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ अंतर्गत सिडको उपविभागातील विविध विद्युत वाहिनीचा वीज पुरवठा विद्युत यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी दि. १५ मे ते १८ मे २०२४ या कालावधीमध्ये रोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत बंद राहणार आहे.यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह इतर महत्वाची कामे करण्यात येणार आहे तरी ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

कोणकोणत्या परिसरातील वीज पुरवठा बंद असणार   
दि. १५ मे :- ११ के.व्ही. गोविंदनगर विद्युत वाहिनीवरील प्रताप चौक,पांगरेमळा,कुबेर् लाँन्स,पाण्याची टाकी तसेच परिसर.
दि. १६ मे :- ११ के.व्ही. लेखानगर विद्युत वाहिनीवरील राणाप्रताप चौक,औदुंबर बस स्टॉप,प्रभात कॉलनी,स्टेट बँक,लाईफ केअर रुग्णालय,शिवाजी भाजी मार्केट,बुरकुले नगर,पांगरे मळा तसेच परिसर.
दि. १६ मे :- ११ के.व्ही. प्रकाश विद्युत वाहिनीवरील विश्वास बँक, चंद्रावेल, सुनील मेडिकल, शारदा निकेतन, इंदिरानगर बोगदा, दत्ता टायर तसेच परिसर.
दि. १७ मे :- ११ के.व्ही. सदगुरु नगर विद्युत वाहिनीवरील गणपती मंदिर, सागर स्वीट, मनोहर नगर, सदगुरु, सदाशिव नगर, चर्च लाईन, काशिकोनगर तसेच परिसर.
दि. १७ मे :- ११ के.व्ही. पिम्प्रीकर विद्युत वाहिनीवरील बीएसएनल चौक, पिम्प्रीकर रुग्णालय, पाटील क्लासिक, रिलायन्स अपार्टमेन्ट, अश्विनी रुग्णालय, जॉगिंग ट्रँक तसेच परिसर.
दि. १८ मे :- ३३ के.व्ही. सिडको विद्युत वाहिनीवरील अंबड एम.आय.डी.सी., मारीगो इमारत, उपेंद्र नगर, उत्तम नगर काँलेज, महाकाली चौक तसेच परिसर. वरीलप्रमाणे परिसरातील वीज पुरवठा  देखभाल व दुरुस्तीच्या कामा करीत बंद करण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात येत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.