नाशिक मध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग :शहरातील अनेक भागात बत्ती गुल

0

नाशिक,दि, ११ मे २०२४ – नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने प्रशासकीय यंत्रणेची अन् नागरिकांची दाणादाण उडवली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने (Heavy rain in Nashik) एकच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे नाशिक शहरातील बहुतांश भागात सुमारे दीड दोन तास बत्ती गुल झाल्याने नागरीकांचे प्रचंड हाल झाले.अचानक बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. कामासाठी घराबाहेर पडलेल्या,अन् कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना पावसाचा जोर ओसरेपर्यंत आसरा घेऊन थांबावे लागले.

हवामान विभागाने शनिवार आणि रविवारी असा दोन दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.त्यामुळे दोन दिवस नाशकात असाच पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील दोन दिवस पावसाला अनुकूल वातावरण असल्याने आकाश अंशत: ढगाळ राहणार असून दुपारनंतर पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)ने व्यक्त केली आहे.नाशिक मध्ये सकाळ पर्यंत 8.7 मी मी पावसाची नोद करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.