Nashik : राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर
६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाशिक केंद्रातून हा वास कुठून येतोय...? प्रथम
मुंबई – ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉमिंग आर्टस, नाशिक या संस्थेच्या हा वास कुठून येतोय…? या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच संवर्धन बहुउद्देशीय संस्था, नाशिक या संस्थेच्या आला रे राजा या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे नाटयसेवा थिएटर, नाशिक या संस्थेच्या बाई जरा कळ काढा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक सचिन शिंदे (नाटक- हा वास कुठून येतोय …?), द्वितीय पारितोषिक रोहित पगारे (नाटक-आला रे राजा), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रफुल्ल दिक्षीत (नाटक हा वास कुठून येतोय …?), द्वितीय पारितोषिक रवी रहाणे (नाटक आला रे राजा), नेपथ्य : प्रथम पारितोषिक निलेश राजगुरु (नाटक-आला रे राजा), द्वितीय पारितोषिक लक्ष्मण कोकणे (नाटक हा वास कुठून येतोय …?), रंगभूषा : प्रथम पारितोषिक ललित कुलकर्णी (नाटक- द लॉर्ड अॅण्ड द किंग-), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक- हा वास कुठून येतोय …? ), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक दिलीप काळे (नाटक- आला रे राजा) व पुजा पुरकर (नाटक बाई जरा कळ काढा), अाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे क्षमा देशपांडे (नाटक- हा वास कुठून येतोय …?), सई मोने (नाटक फायनल ड्राफ्ट), प्राजक्ता गोडसे (नाटक-द लॉर्ड अॅण्ड द किंग), रसिका देशपांडे (नाटक- स्वातंत्र्याच्या सावल्या), सुमन शर्मा (नाटक-क्रकच बंध), धनंजय गोसावी (नाटक- हा वास कुठून येतोय…? ), निलेश सुर्यवंशी (नाटक- हा वास कुठून येतोय …?), आशिष चंद्रचुड (नाटक- द लॉर्ड अॅण्ड द किंग) शुभम साळवे (नाटक- आज बस इतकंच पुरे), राहुल मंगळे (नाटक- कात).
दि. २१ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२२ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाटयगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. मधु जाधव, श्री. गुरु वठारे आणि श्रीमती गौरी लोंढे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.