Nashik : ऋवेद संगीत महोत्सवाचे शनिवारी आयोजन

0

नाशिक, १ फेब्रुवारी २०२३ – नाशिकच्या “ऋग्वेद” संस्थेतर्फे ऋग्वेद संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं ६ वा. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृहात हा महोत्सवआयोजीत करण्यात आला आहे.

या महोत्सवात सुप्रसिद्ध तबलावादक स्व.प्रमोद भडकमकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ “नादसाधक ” पुरस्काराचे वितरण होणार असून यंदाचा वर्षी हा पुरस्कार श्री. प्रसाद लोहार यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच प्रसाद लोहार यांचे एकल तबला वादन आयोजित केले असून त्यांना हार्मोनियमवर ईश्वरी दसककर साथ देणार आहेत. त्यानंतर श्री. नागेश अडगावकर, पुणे. याचे शास्त्रीय गायन आयोजीत केले आहे. त्यांना हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी तसेच तबल्यावर रोहन पंढरपूरकर तर पखवाजवर सिद्धेश उंडाळकर साथसंगत करणार आहेत. या कार्यक्रमाला मुक्त प्रवेश आहे. तरी सर्व रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ऋग्वेद संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.