नाशिक,दि,८ जानेवारी २०२४ – नाशिककरांच्या आवडीची आणि पसंतीची हि ‘रन फॉर फन’ शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ आयोजन करण्यात आले असून नाशिकच्या महात्मानगर मैदानावरून सकाळी साडेसात वाजता नाशिक रन सुरू होईल. ज्याचा मार्ग मोठ्यांसाठी ४.५ किलोमीटर व लहानांसाठी २.५ किलोमीटर असा असणार आहे. नाशिक रन २०२४ च्या नोंदणी करीता लहानांसाठी रू. २७०/- प्रत्येकी तर मोठ्यांसाठी रु. ३००/- प्रत्येकी अशी ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक नोंदणी धारकास आकर्षक असा ‘नाशिक रन २०२४ चा टी-शर्ट मोफत देण्यात येईल,अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली .
या रन मध्ये भाग घेणाऱ्यास नाशिक रनचा टी-शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. लहानांसाठी २६,२८,३०,३२,३४ तर मोठ्यांसाठी ३६,३८,४०,४२,४४ या साईज मध्ये टी-शर्ट उपलब्ध आहेत. नाशिक रन २०२४ करिता नोंदणीसाठी नोंदणी स्टॉल सोमवार दिनांक ०८ जानेवारी २०२४ पासून महात्मा नगर ग्राउंड येथे सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सुरु झाला आहे. २० पेक्षा जास्त नोंदणी करणाऱ्या ग्रुप ने श्री. नितीन देशमुख यांच्याशी मोबाइल नंबर ९७६५४ ९९२३६ वर संपर्क साधावा,
नाशिक मधील नामवंत प्रायोजकांद्वारे सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ बक्षीसांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जे नागरिक मैदानावर हजर असतील तेच बक्षीस पात्र असतील
नाशिक रन च्या विश्वस्तांमार्फत सर्व नाशिककरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नाशिक रन बद्दलच्या इतर माहिती करिता ९७६५४ ९९२३६ ह्या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत ट्रस्टी प्रबल रे ,चेअरमन रश्मी रंजन भुयान ,व्हा. चेअरमन अशोक पाटील, सेक्रेटरी अनिल दैठणकर,खजिनदार राजाराम कासार,रमेश शालीग्राम, अविनाश देशपांडे, मुकंद भट,नितीन देशमुख, स्नेहा ओक आदी उपस्थित होते.