नाशिक, दि २७ डिसेंबर २०२४ –६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून लोकहितवादी मंडळ,नाशिक या संस्थेच्या आवर्तन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच भडक दरवाजा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, नाशिक या संस्थेच्या ऐश्वर्या ब्युटीपार्लर या नाटकास द्वितीय पारितोषिक तसेच अर्थनिता फाऊंडेशन, नाशिक या संस्थेच्या सेलिब्रिटी या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री विभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या तीन्हो नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे नाशिक केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक आर्या हिरे (नाटक-ऐश्वर्या ब्युटी पार्लर), द्वितीय पारितोषिक आनंद कुलकर्णी (नाटक-आवर्तन), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक सागर पाटील (नाटक- आवर्तन), द्वितीय पारितोषिक – विनोद राठोड (नाटक-सशक्त), नेपथ्यः प्रथम पारितोषिक शैलेंद्र गौतम (नाटक-विनाशकाले) द्वितीय पारितोषिक वरुण भोईर (नाटक-ऐश्वर्या ब्युटीपार्लर), रंगभूषाः प्रथम पारितोषिक माणिक कानडे (नाटक-ऐश्वर्या ब्युटीपार्लर), द्वितीय पारितोषिक माणिक कानडे (नाटक-आवर्तन) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्वप्नील जोशी (नाटक पूर्णविराम) व लक्ष्मी पिंपळे (नाटक- सेलिब्रिटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रोहिणी जोशी (नाटक-आवर्तन), रीया राज (नाटक- गौतमी), आर्या प्रशांत (नाटक-ऐश्वर्या ब्युटीपार्लर), दर्शना कहुं (नाटक पूर्णविराम), वेदीका अंभोरे (नाटक-मी आणि माझी कला), अपूर्ण इंगळे (नाटक- दिल्लीची किल्ली), मिलिंद कुलकर्णी (नाटक-आवर्तन), सचिन रहाणे (नाटक-थींथ अमेंडमेंट), अभिषेक गायकवाड (नाटक-स्पायडरमॅन), भरत कुलकर्णी (नाटक-त्यान आईच ऐकल)
दि. २८ नोव्हेंबर, २०२४ ते २४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले, स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. बाळ बरगाळे, श्री. प्रकाश खोत आणि श्रीमती सारिका पेंडसे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी,अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.