शनिवार २१ जूनला संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद – मनपाची सूचना

0

नाशिक, दि. १८ जून २०२५ – Nashik Water Supply Shutdown नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नाशिक महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे.

महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नविन व्हॉल्व्स व फ्लो मीटर्स बसविण्याचे काम, तसेच पाइपलाइनशी संबंधित देखभाल व सुधारणा या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीने शटडाऊनची मागणी केली आहे. या अनुषंगाने शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान हे काम करण्यात येणार आहे.

🔧 शहरभर पाणीपुरवठा बंद: प्रमुख बाबी(Nashik Water Supply Shutdown)
शनिवार, २१ जून २०२५: सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत शटडाऊन
संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद
रविवार, २२ जून २०२५: सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार

📣 नागरिकांना आवाहन
नाशिक महापालिकेने शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि या कामांमध्ये महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर पाणीपुरवठा व्यवस्थेत दक्षता, अचूक मोजमाप आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.

🚰 यापूर्वीही झालेल्या सुधारणा यशस्वी
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत यापूर्वीही जलप्रणाली सुधारणा योजनेत अनेक भागांत सुधारित पाईपलाईन, ऑटोमेशन यंत्रणा व व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुस्थित व विश्वासार्ह होण्याची अपेक्षा आहे.

सर्व नाशिककरांनी या महत्त्वाच्या विकासकामासाठी २१ जूनच्या पाणी बंद राहण्याच्या निर्णयास सहकार्य करावे, अशी विनंती नाशिक महापालिकेने केली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!