संपूर्ण नाशिक शहरात शनिवारचा पाणीपुरवठा बंद :रविवारी कमी दाबाने पाणी येणार

0

नाशिक,दि,२० मार्च २०२५ – नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यामुळे येत्या शनिवारी (दि. २२) रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा(​​Nashik City Water Supply) बंद राहील. तसेच रविवार दि. २३ मार्चला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती नाशिक महानगर पालिकेने एका पत्रकान्वये कळवली आहे.

त्याअनुषंगाने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र व विविध जलकुंभ(पाण्याच्या टाक्या) येथे दि. 22/3/2025 रोजी करावयाच्या विविध कामाच्या अनुषंगाने शटडाऊन नियोजित केलेले आहे. तसेच पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती, व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी हाती घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शनिवार दि. २२ मार्च रोजीचा संपुर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.रविवार दि. २३ मार्च रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!