Nashik : आज ‘तालाभिषेक बैठक’ संगीत महोत्सवाचे आयोजन
११ मे रोजी डॉ.अलका देव मारुलकर यांच्या हस्ते पं.अविराज तायडे यांचा सत्कार
नाशिक, दि. १० मे २०२५ – Nasik Music Festival: नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नांदणारा एक वैभवशाली उपक्रम –‘तालाभिषेक बैठक’ संगीत महोत्सव — यावेळी विशेष स्वरूपात साजरा होतो आहे. पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव १० व ११ मे २०२५ रोजी विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक येथे पार पडतो आहे.
पहिला दिवस : डॉ. अलका देव मारुलकर यांची प्रकट मुलाखत
शनिवार, १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अलका देव मारुलकर यांची संगीतप्रेमींशी प्रकट मुलाखत आयोजीत करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार व संगीत अभ्यासक वंदना अत्रे संवाद साधणार असून शिष्या शिवानी दसककर, कल्याणी तत्ववादी, संवादिनीवर ईश्वरी कदडी, तसेच तबल्यावर सुजीत काळे आणि सारंग तत्ववादी साथ देतील.
डॉ. मारुलकर या ग्वाल्हेर-जयपूर-किराणा घराण्याच्या गायकीत पारंगत, आणि शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय ठुमरी, चैती, होरी, कजरी प्रकारात प्राविण्य असलेल्या गायिका आहेत.
दुसरा दिवस : अद्वय पवार यांचे तबलावादन व पं. अविराज तायडे यांचा सत्कार( Nasik Music Festival)
रविवार, ११ मे रोजी सायं ६ वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पवार तबला अकादमीचे ज्येष्ठ विद्यार्थी अद्वय पवार यांचे स्वतंत्र तबलावादन होणार आहे. संवादिनीवर प्रतीक पंडित साथ करतील.
यानंतर नाशिकचे सुप्रसिद्ध गायक पं. अविराज तायडे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त डॉ. अलका मारुलकर यांच्या हस्ते विशेष अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. तायडे गुरु परंपरेत पं. देवराज भालेराव, पं. सी. आर. व्यास, पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असून गेली ३० वर्षे नाशिकमध्ये संगीतसेवा करत आहेत.
महोत्सवाचा समारोप पं. तायडे यांचे शिष्य ज्ञानेश्वर कासार यांच्या गायनाने होणार आहे, साथसंगतीला सुरज बारी (संवादिनी) आणि कुणाल काळे (तबला) असतील.
विशेष अतिथी आणि संयोजन
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अनिल दंडे (दंडे ज्वेलर्स) उपस्थित राहणार असून सूत्रसंचालन सुनेत्रा महाजन करतील. संपूर्ण महोत्सवाचे संयोजन अल्पारंभ फाउंडेशनने केले आहे. या कार्यक्रमास सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन पवार व रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.
[…] दिवशी पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक येथे होणाऱ्या ‘वैशाखी […]
[…] संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या […]