नाशिक – अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा वि.वि शिरवाडकर लेखन पुरस्कार, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार, बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराचे वितरण आज सायंकाळी ५:३० वाजता कालिदास कलामंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते होणारआहे.मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.कोरोनामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे आज सोमवारी (दि. २५ ऑक्टोबर) रोजी हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे.
२०२०-२०२१ मध्ये पुरस्कार समितीने वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार शफाअत खान, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारासाठी दिलीप प्रभावळकर , बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कारासाठी रवींद्र ढवळे यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकरांची मुलाखत शिवानी जोशी या घेणारआहेत.या कार्यक्रमात प्राजक्त देशमुख (युवा साहित्य पुरस्कार मानकरी), शिरीन पाटील (महाराष्ट्रची लावण्यवती), क्षमा देशपांडे (महाराष्ट्रची लावण्यवती) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारासाठी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शाहू खैरे, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिगणे, राजेश जाधव, राजेश भुसारे यांची निवड समिती तयार करण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्याला सर्व रंगकर्मींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख कार्यवाह सुनील ढगे आणि नाट्य परिषेच्यावतीने करण्यात आले आहे.
हे आहेत पुरस्कारार्थी
स्वर्गीय दत्ता भट स्मृती अभिनय पुरस्कार (पुरुष)-राजेंद्र चव्हाण
स्वर्गीय शांता जोग स्मृती अभिनय पुरस्कार (स्त्री)-रोहिणी ढवळे
स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार ( (दिग्दर्शन)-प्रा, रवींद्र कदम,
स्वर्गीय नेताजी भोईर स्मृती पुरस्कार (लेखन)-विवेक गरुड
स्वर्गीय वा श्री पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी)-धनंजय वाबळे
स्वर्गीय जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) फणींद्र मंडलिक
स्वर्गीय रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य)-चंदकांत जाडकर
स्वर्गीय गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाश योजना)-विजय रावळ
स्वर्गीय डॉ रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत)-रमाकांत वाघमारे
स्वर्गीय शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार-राजन अग्रवाल
विशेष योगदान पुरस्कार (संगीत क्षेत्र)
डॉ. अविराज तायडे
सुभाष दसककर
नितीन पवार
कै.नवीन तांबट
विशेष कोविड योद्धा पुरस्कार
डॉ संजय धुर्जड
डॉ मिलिंद पवार