बिग बॉस मराठीच्या घरामधून दादूस गायब … नक्की काय झालं ? कुठे गेले दादूस ?

0

मुंबई बिग बॉस मराठीच्या घरामधून काल आदिश वैद्य घराबाहेर पडला. महेश मांजरेकरांनी सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली. आता नवा आठवडा सुरू होणार आहे. आणि कालच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दादूस यांना confession रूममध्ये बिग बॉस यांनी बोलावलं आणि इतर सदस्य जेव्हा confession रूममध्ये पोहचले तेव्हा त्यांना तिथून दादूस गायब झालेले दिसले.नक्की काय झालं ? कुठे गेले दादूस ? हा प्रश्न सदस्यांना आणि प्रेक्षकांना देखील पडला असेलच.आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं ते प्रेक्षकांना समजणार आहे.

आज जय, मीरा, उत्कर्ष आणि गायत्री एका मुद्द्यावरून घरामध्ये सांभाषण करताना दिसणार आहेत. जय आणि उत्कर्ष एका गोष्टीवर बोलत असताना जय म्हणाला, “काय करायचं तर ते कर मला नको विचारूस. मी काहीतरी बोलायला जातो, उलट माझ्यावर येतं.मी आता काही बोलणारच नाहीये. मीराच त्यावर म्हणण होतं “मलासुध्दा हेच बोललं जातं”. जय यावर म्हणाला, “मला असं वाटतं आपण आता कसं खेळल पाहिजे आविष्कार दादासारखं रविवारी सेफ व्हायचं आणि झोपून जायचं.

उत्कर्षने जयला समजावले, सरांना खूप अपेक्षा आहेत आपल्याकडून… आपण ते केलचं पाहिजे. जसं सर म्हणतात सूर गवसेल तुम्हांला… कळणार आपल्याला. जय म्हणाला, “सर जे म्हणाले मला तू स्ट्रॉंग प्लेयर आहेस, सरांना एकचं प्रॉब्लेम आहे माझा ange तर मी फक्त टास्कमध्येच खेळणार बाकी शांत बसणार.”

“मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे” – स्नेहा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जा मस्ती करतात, खेळाबद्दल देखील बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे त्याबद्दल देखील त्यांची चर्चा होतंच असते. आज देखील जय स्नेहाला सोनाली बद्दल काहीतरी सांगताना दिसणार आहे.

जय स्नेहाला म्हणाला सोनाली जरी विरुध्द टीममध्ये असली तरीदेखील मी सोनालीला कधीच सांगत नाही की विशालसोबत नाही माझ्यासोबत खेळ. तिने आजही मला सांगाव. मी तिला फक्त एकचं सांगतो की सोनाली तू दिसतं नाहीये, मागे आहेस मग ते गृपमध्ये असो वा गेममध्ये असो. स्वत:वरती विश्वास पाहिजे. कोई रहे ना रहे साथ…हम खंबीर है असं पाहिजे. म्हणून मी डॉक्टरला (उत्कर्षला) म्हणतो आपण दोघे जरी असलो ना तरी आपण भरपूर आहे. विचार नका करू चारजणचं पाहिजे.. स्नेहा म्हणाली “तसाच मी देखील विचार करते, मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे.

त्यावर जय म्हणाला मलादेखील काऊंट करत जा तुझ्यासोबत. मला टीममध्ये घेशील तुझ्या, अशी का करतेस नकोय का तुला मी तुझ्या टीममध्ये” स्नेहा म्हणाली माझी टीमचं नाहीये जय म्हणाला आपण टीम बनून जाऊ.”

बघूया काय घडणार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.