नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

अनेक जण जखमी :मृतांमध्ये ९ महिला,४ मुले आणि ५ पुरुषांचा समावेश

0

नवी दिल्ली,दि,१६ फेब्रुवारी २०२५ –नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल रात्री(शनिवारी १५ फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा संपूर्ण देश हादरला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर १४ आणि १६ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच, अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या रुग्णांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मृतानाचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ९ महिला, ४ मुले आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणातील एका व्यक्तीचा समावेश आहे.या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्यथेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रयागराजला जाण्यासाठी गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली आणि गर्दी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळली. त्यातच चेंगराचेंगरी झाली.घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास दिल्ली रेल्वे स्थानकावर अचानक गडबड गोंधळ उडाला . या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस आणि मगध एक्सप्रेस रेल्वेने जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. या दरम्यान, अचानक रात्री साडे आठ ते नऊ वाजताच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. प्रत्येकाला ट्रेनमध्ये जागा हवी होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पकडण्यासाठी गर्दी इतकी होती की तिकीट असणाऱ्यांना देखील जागा मिळाली नाही. यामुळेच चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची केला शोक व्यक्त
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी मुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!