एसटी महामंडळाच्या २ हजार जुन्या बस लिलावासाठी सज्ज – MSTC तर्फे विक्री प्रक्रिया सुरू

ST बस लिलावाची प्रक्रिया सुरू | राज्यभरातील ३२ आगारांमधील गाड्या मुंबईत विक्रीसाठी

0

मुंबई, दि. २६ जून २०२५ – Old MSRTC Bus Disposal राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यातील तब्बल २ हजार बसगाड्या आता भंगारात टाकण्यात येणार आहेत. या गाड्यांचा लिलाव MSTC (Metal Scrap Trade Corporation) या केंद्र सरकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

🔧 भंगारात का काढतायत बसगाड्या?(Old MSRTC Bus Disposal)
सध्या एसटी महामंडळाकडे सुमारे १४,००० बसगाड्या कार्यरत आहेत. यामधील अनेक बस १० ते १५ वर्षांहून अधिक कालावधीच्या असून त्यांची देखभाल खर्चिक ठरत आहे. यामुळे त्या “अनइकॉनॉमिकल टू ऑपरेट” ठरत असल्याने टप्प्याटप्प्याने त्यांना भंगारात काढले जात आहे.

📍 मुख्य बाबी:
राज्यभरातील ३२ आगारांमध्ये या बस उभ्या आहेत.

लिलाव प्रक्रियेसाठी सर्व गाड्या मुंबईत हलवण्यात येणार आहेत.

पुढील २ ते ३ वर्षांत आणखी ५,००० बसगाड्या भंगारात जाण्याची शक्यता.

दरवर्षी सरासरी २ हजार बस कार्यमुक्त केल्या जातात.

लिलावातून योग्य दर मिळेल का? याबाबत शंका उपस्थित.

🧾 MSTC लिलावात काय विकले जाणार?
या लिलावात केवळ लोखंड नव्हे तर इलेक्ट्रिकल, प्लॅस्टिक, रबर, काचेचे घटक, बसचे इंजिन पार्ट्स यांचाही समावेश असणार आहे.

एसटीला आर्थिक दिलासा मिळणार?
वर्तमान आर्थिक स्थितीत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, हे लिलाव महामंडळाला थोडा आर्थिक दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र बसला “स्क्रॅप रेट” पेक्षा अधिक किंमत मिळणार का, हे अजूनही अनिश्चित आहे.एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे 14 हजार बसेस असून, वयोमर्यादेमुळे जुन्या झालेल्या बसेस भंगारात काढण्यास सुरुवात केलीय.दरवर्षी जवळपासे 2 हजार बसेस भंगारात निघत असून, येत्या दोन ते तीन वर्षात 5 हजार बसेस भंगारात निघणार आहेत. एसटीच्या बसला योग्य दर मिळेल का, अशी शंका व्यक्त करण्यात येतेय.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!