माझ्या हितचिंतक मित्रांनो,
शेतकरी बंधूंनो.मला अनेक मित्र गप्पांच्या ओघात विचारतात, तू नेहमी पुढाऱ्यांच्या गराड्यात वावरणारा एकदम शेतीकडे कसा वळला.त्यांचा प्रश्न रास्त आहे.खरे तर माझी नाळ मातीशी जोडल्या गेली आहे.सद्यस्थितीत आपण शेती मजुरांसाठी आणि पेस्टी साईड विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी करीत असल्याचे माझे ठाम मत आहे.भरमसाठ वाढलेली मजुरी, शेतातील पिकासाठी दुकानदार सांगत असलेले औषध आणि ते ही शेती आणि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक औषधे घेऊन फवारणी करीत आहोत. याचे अत्यंत प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत.
दिवसेदिवस कॅन्सर, किडणी तसेच विविध प्रकारच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत ही वस्तुस्थिती आहे.अंतर्मनात विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.या सर्व बाबींचा विचार केला तर विषमुक्त सेंद्रीय शेती करणे काळाची गरज आहे. सेंद्रीय शेती करा म्हणणे सोपे आहे. सेंद्रीय पिकाला भावही चांगला आहे. परंतु, प्रत्यक्ष करणे, जिकरीचे आहे. त्यात शेती अनुदानासाठी तयार केलेले नियम अत्यंत कुचकामी आणि निव्वळ बावळटपणा सारखे आहे असेच मला वाटते. ते कसे तयार केले हा स्वतंत्र विषय आहे . सेंद्रीय शेतीसाठी सुरुवातीला काही रुपयांचे भांडवल गुंतावे लागते. त्यातही सेंद्रीय नावाखाली विविध प्रकारचे बि बियाने, औषधे विक्री करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे.या वाटचालीत अमाप कष्ट आणि भांडवल या दोन्ही गोष्टी आल्याचं.परंतु एकदा सेंद्रीय शेती सुरू झाली की मग तुमच्या हातात पैसा खेळणार यात शंकाच नाही
या सर्व खाचखलग्यांचा विचार करून काही तरुण शेतकरी संघर्ष करीत आहे.त्याला आता यश येऊ पहात आहे.यासाठी जीवामृत निर्माण करनारा एन एअरबेटिक फुगा बसविणे आवश्यक आहे.त्याची शमता दररोज २०० लिटर जिवामृत काढण्याची आहे.
कमीत कमी मजूरा बरोबर स्वतः शेतीत राबून मोठया कष्टाने सेंद्रिय शेतीचा आदर्श उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.नाशिकमध्ये सेंद्रिय भाजीपाला पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर इगतपुरी तसेच इतर ठिकाणाहन उपलब्ध करण्यात येत आहे. यानिमित्ताने शेतकर्यांचा सेंद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, ग्राहकांना उपलब्ध होत आहे. शेतकरी व ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी कमी करून, यातून शेतकर्यांच्या आर्थिक फायद्यात व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा उद्देश या माध्यमातून प्रयत्न करन्यात येत आहे. जीवमृत मुळे शेतीचा सेंद्रिय पोत सुधारत आहे.
शरीर विवीध रोगांचे माहेरघर बनू नये यासाठी नागरिकही काळजी घेत आहेत. रासायनिक औषधांच्या फवारणीद्वारे पिकविल्या जाणाऱ्या विषसमान भाजीपाल्या पेक्षा सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला घेण्याकडे नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे. असा भाजीपाला उपलब्ध करून देणारी ‘फार्मर्स मार्केट’ ही संकल्पना शहरात रुजली असून, शाखाविस्तारही होऊ लागला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी वाढल्याने उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.ताजा, टवटवीत आणि सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला आणि रसाळ फळे आरोग्यासाठी संजावनी ठरतात. शहरात सेंद्रिय भाजीपाल्याला मागणी वाढू लागल्याने शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळू लागले आहे.
शहरात विषविरहित पौष्टिक भाजीपाला मिळण्यास सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवारी फार्मर्स मार्केट भरू लागले आहे.नाशिकसह दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि आणखी काही तालुक्यांमधून सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन वाढले असून, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकविण्याचे व्रत जोपासणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कांदे, बटाटे, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, वालपापडी, भोपळा, कारले, वांगी, गाजर, मुळा, बीट, काकडी, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची अशा फळभाज्या बरोबर पालक, शेपू, मेथी, हरभरा, कोथिंबीर, कांदापात, पुदिना यांसारख्या पालेभाज्या ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.
सेंद्रीय शेती करताना प्रथम वीरोधही होतो, नवीन सोडून काय जून्या पद्धतीने शेती करून याचे काय भले होणार?अशी हेटाळणी होते,मात्र सेंद्रीय शेती बहरून येते आणि पैसे दिसू लागले की,मग परिसरही सेंद्रिय गोडवा गाऊ लागतो……(क्रमशः)
हरिभाऊ सोनवणे
(पत्रकार तथा प्रयोगशील शेतकरी- ९४२२७६९४९१)