पाकिस्तानात एकाच दिवशी १२ स्फोट;कराची,लाहोरसह ९ शहरांमध्ये भीतीचं वातावरण
ऑपरेशन सिंदूर 02 पाकिस्तान पुन्हा हादरला :अनेक शहरांमध्ये बॉम्ब स्फोट;ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा
इस्लामाबाद, ८ मे २०२५ – Pakistan Bomb Blast भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानातील ९ प्रमुख शहरांमध्ये स्फोटांची मालिका सुरु झाली आहे.या हल्ल्यात पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिम उध्वस्त केले आहे.
(Pakistan Bomb Blast) कराची, गुजरांवाला, रावळपिंडी, लाहोर, अटक, पेशावर, क्वेटा, मुलतान, फैसलाबाद आणि हैदराबाद या शहरांमध्ये तब्बल १२ स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटांमुळे पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पाकिस्तानी लष्कराने याला “संशयित ड्रोन हल्ला” असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला आहे की,१२ हेरॉन ड्रोनद्वारे पाकिस्तानमधील नऊ शहरांवर लक्ष केले गेले, त्यानंतर या शहरांमध्ये जोरदार स्फोट झाले. पाकिस्तानच्या DG ISPR लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले की, लाहोर, रावळपिंडी, गुजरांवाला, चकवाल, अटक, बहावलपूर, मियांवाली, छोर आणि कराची ही ठिकाणं हल्ल्याचे लक्ष्य होती.
पाक लष्कराच्या मते, त्यांनी हे ड्रोन निष्क्रिय केले असले तरी आत्तापर्यंत ९ स्फोट झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
विशेष म्हणजे, या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या हेडक्वार्टर-९ (HQ-9) एअर डिफेन्स मिसाईल लाँचर युनिट्सना मोठे नुकसान झाले आहे. हे HQ-9 युनिट्स चीनकडून घेतलेले असून, हवेतील धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात.
लाहोरमध्ये झालेल्या स्फोटात चार जण जखमी, तर अटकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
या स्फोटांचे आवाज दूरवर ऐकू गेले असून, संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच दबावात असलेल्या पाकिस्तानला या स्फोटांनी आणखी हादरवले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लष्कर आणि गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत.
प्रभावित शहरांची यादी: कराची, गुजरांवाला, रावळपिंडी, पेशावर, क्वेटा, लाहोर, मुलतान, फैसलाबाद आणि हैदराबाद.
या घटनेमुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून लष्कर आणि गुप्तचर संस्था अलर्टवर आहेत.
India neutralises Pakistani drone, missile attacks; targets air defence systems
Read @ANI Story |https://t.co/vQ70ePTTe6#India #Pakistan #drone #OperationSindoor pic.twitter.com/Q3sXcMbpvw
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2025
[…] […]