मुंबई,दि,२६ फेब्रुवारी २०२४ –आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास(Pankaj Udhas) यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. उधास कुटुंबीयांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
एका निवेदनात कुटुंबीयांनी म्हटले आहे की, “अत्यंत जड अंत:करणाने,२६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे.” या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
गाणी,गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. चिठ्ठी आयी है.. ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही.
गायक सोनू निगमने त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सोनूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “माझ्या बालपणीचा सर्वात महत्त्वाचा भाग आज हरवला आहे. श्री पंकज उधास जी, मला तुमची नेहमी आठवण येईल.