पेट्रोल-डिझेलच्या किंमती कडाडल्या : आज दरवाढीचा नवा उच्चांक

0

मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने आज नवा उच्चांक गाठला आहे. दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आज (दि.२७ ऑक्टोबर) रोजी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्याआहेत.भारतीय तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL ने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर २५ पैसे आणि डिझेलचे दर ३७ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

यामुळे ऐन दिवाळीत माल वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून १०७.९४ रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत आता ९६.६७ रुपये प्रति लिटर झालीआहे.भारतीय तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११३.८० रुपयानंव विकलं जात आहे, तर डिझेल १०४.७५ रुपये प्रति लिटरनं विकलं जातआहे.तर नाशिक मध्ये पेट्रोल ११४.१९ रुपये तर डिझेल १०३.५१ रुपये झाले आहेत.

कोलकातामध्ये पेट्रोल १०८.४५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९९.७८ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये १०४.८३ प्रति लिटरनं पेट्रोल विकलं जात आहे. तर डिझेल १००.९२ रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल६.७५ रुपयांनी महागले आहे तर मागील २७ दिवसांत डिझेल ८.०५ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेल दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये तफावत झपाट्याने कमी होतआहे.ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत २० हून अधिक वेळा इंधनदरात वाढ झालीआहे.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होतो आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पहिल्यांदा पेट्रोल ११९.७९, डिझेल ११०.६३ रुपये प्रति लीटर आहे. मध्यप्रदेशमध्ये पेट्रोलचा दर ११९.०८ रुपये प्रति लीटर, तर डिझेल १०८.२५ रुपये आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.