उजळणार प्राजक्तप्रभा : संमेलन वातावरण निर्मितीची अनोखी संध्याकाळ

0

नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी साहित्याशी निगडीत अशा काही कार्यक्रमांचे नियाेजन लाेकहितवादी मंडळाने केले आहे. त्याची सुरुवात गुरुवार दि. १८ नाेव्हेंबर २०२१ राेजी ‘प्राजक्त प्रभा’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाने आणि कविता वाचनाने हाेत आहे.

सातत्याने काही आगळं-वेगळं करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी या निमित्ताने कवयित्री म्हणून चाहत्यांच्या भेटी येत आहे. अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालन यानंतर ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह घेऊन ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त हाेणार आहे. त्यातून तिचे संवेदनशील मन उलगडत जाणार आहे.

या काव्यसंग्रहाचे नाशिक येथील प्रकाशन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ, ज्येष्ठ साहित्यिक मिलींद जाेशी आणि प्राचार्य प्रशांत पाटील ह्यांच्या हस्ते हाेणार आहे. खान्देश मराठा मंडळ, नाशिक यांच्या साैजन्याने हा कार्यक्रम दि. १८ नाेव्हेंबर २०२१ राेजी सायं. ६ वाजता कालिदास कलामंदिर. नाशिक येथे हाेणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना प्रवेश खुला असून त्याच्या प्रवेशिका दि. १६ नाेव्हेंबर २०२१ पासून सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते ७ यावेळेत कालीदास कलामंदिरामध्ये उपलब्ध असतील. तरी रसिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लाेकहितवादी मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक, प्रमुख कार्यवाह श्री. जयप्रकाश जातेगावकर आणि संमेलनाचे सांस्कृतिक समिती प्रमुख विनोद राठोड यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.