मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामधून काल नीथा शेट्टी – साळवी घराबाहेर पडली. आणि बिग बॉस मराठी सिझन तिसराला मिळाले या पर्वाचे TOP १० सदस्य. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही. आता हे टॉप १० सदस्य कसा खेळ खेळतील ? या आठवड्यात कोण कोणते सदस्य नॉमिनेशनमध्ये जातील ? कोण घराचा कॅप्टन बनेल ? साप्ताहिक कार्य काय असेल ? हे हळूहळू समजेलच.
बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडते आहे. त्याला कारणसुध्दा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा. घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिला. बघूया पुढे काय होते.
विशाल मीनलचा अबोला..
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे हे सुरूच असतात. पण, विशाल आणि मीनलचा अबोला काही संपायचं नावचं घेत नाहीये. टास्कनंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये मीनल विशाल कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे असे बरेच काही बोलून गेली आणि तेव्हापासून दोघांमध्ये हा अबोला सुरू झाला.
आज मीनल, विशाल, विकास आणि सोनालीमध्ये यावरूनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली विशालला म्हणाली, सुरुवात तरी करा बोलायला… विशाल म्हणाला पाया पडू तुझ्या… सोनाली म्हणाली, ती पण करेल, तू पण काही मनामध्ये पकडू नकोस. मीनल त्यावर म्हणाली, मला काही नाही बोलायला. त्यावर विशाल म्हणाला, तू मीनल शाह आहे मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठ आहे माझं नाहीये. विकासचे म्हणणे आहे, तू पण जे बोलास ते पण चुकीचे होते… विशाल म्हणाला मी काय चुकीचे बोलो ? विकास आणि सोनाली विशालला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. आणि ही सगळी चर्चा सुरू असताना मीनलला रडू कोसळले. बघूया हा अबोला कधी तुटणार ?
पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीवर.