
मुंबई – ‘कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… ‘ हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे. तांबूली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान इंग्रजीमध्ये बीटल लीफ, हिंदीमध्ये पानचं पान, तेलगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबुल असं म्हटलं जातं. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत सामान्य ‘शौकीन’ तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते. अश्या खास ‘शौकिन’ मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता हे ‘शौकीन’ पान धनंजय केतकर आणि विराज लेले यांनी मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे.

आयुष्यात एकदाही पान खाल्ले नाही, असा ‘शौकीन’ शोधूनही सापडणार नाही. पान आणि सुपारीने भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील सांकृतिक, सामाजिक भावविश्व एवढे व्यापले कि आहे, कि त्याशिवाय सर्व सामाजिक व्यवहार बेरंग होवून जातील. पान खाणे हे शौकीन भारतीयांचे प्रमुख वैशिष्ट्य! तोंडात पान, रंगलेले ओठ हे भारतीयत्वाचे प्रतिक म्हटल्यास वावगे ठरू नये. अल्पावधीतच राज्यात विशेष लोकप्रिय झालेला ‘शौकीन’ हा ब्रँड आता खास मुंबईकरांसाठी दादर पश्चिमेच्या रानडे रोड या उच्च- मध्यम वस्तीतमध्ये आजपासून सुरु झाला आहे. दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते – दिग्दर्शक – अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने, विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजीत रमेश तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, धनंजय केतकर, विराज लेले इत्यादी पान शौकीन मान्यवर उपस्थित होते.




