नाशिक – क्रिकेट पंढरीत जगातील सर्वोत्कृष्ट असलेल्या लंडन येथील लॉर्डसच्या मैदानावर चक्क चित्रकार असलेल्या चाहत्याच्या हातात प्रफुल्ल सावंत यांच्या signature सीरिज चे ब्रश पाहावयास मिळाल्याने तेथे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोशल मीडिया वर ही तो फोटो जगभर व्हायरल झाला आहे.एकीकडे सामना निर्णायक स्थितीत असताना दुसरीकडे मैदानावर इंग्लंडच्या एक चाहत्याने थेट नाशिकच्या या चित्रकारास अनोखी भेट दिल्याने विजयाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी सांगितले….

सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकत इंग्लंडला जोराचा झटका दिला. भारतीय टीमने उत्तम खेळाचा प्रदर्शन या सामन्यात केले.भारत आणि इंग्लंडचा कसोटी सामना सुरु असतानाचा लंडन येथील एका चित्रकाराने मैदानावर सामन्याचा आनंद घेत तेथे चित्र काढण्यास सुरुवात केली. याप्रसंगी भारत निर्णायक टप्प्यावर असतानाच या लंडनच्या चाहत्याने भारतीयांना अनोखी भेट देत चक्क तो ज्या ब्रशने चित्र रंगवत होता त्या ब्रशचा फोटो त्याने काढून प्रफुल्ल सावंत यांना पाठवला.विशेष म्हणजे, या ब्रशवर नाशिकचे जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांचे नाव होते. प्रफुल्ल सावंत वगळता इतर कोणत्याही चित्रकाराचे देशात आतापर्यंत चित्रकाराच्या नावाने ब्रशला नाव देण्यात आलेले नसल्याचे प्रफुल्ल सावंत अभिमानाने सांगतात.
जून २०२१ मध्ये प्रफुल्ल सावंत यांच्या ६-६ ब्रशच्या 4 वेगवेगळ्या ब्रशच्या सिरीज बाजारात आणल्या आहेत. सोशल मीडियातून हे ब्रश विक्री होत असल्याचे ते सांगतात. हे ब्रश जलरंगासाठी वापरले जातात. ऑक्टोबर2019 ते चीनमध्ये गेले होते, त्यावेळी एका कंपनीने त्यांना या ब्रशबाबतची कोल्याबरेशन करावे ही विनंती केली आणि आम्ही तुमच्या नावाने ब्रश जगभर प्रकाशित करू अशी विनंती केली तेव्हापासून हे ब्रश त्यांच्या सहीच्या नावाने जगभरात विक्री होत आहेत.
