आजचे राशिभविष्य ,सोमवार, २९ जानेवारी २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष कृष्ण चतुर्थी. हेमंत ऋतू.
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – पूर्वा फाल्गुना.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
“आज वृद्धी दिन” *संकष्टी चतुर्थी* चंद्र उदय मुंबई – रात्री ९.३०, नाशिक रात्री ९.२६.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- चंद्र हर्षल त्रिकोण योग आहे. अचानक लाभ होतील. शुभ घटना घडतील. शेअर्स मधून लाभ.

वृषभ:- घरगुती कामासाठी खर्च कराल. आनंदी राहाल. भाडेकरूंचा प्रश्न मिटु शकतो.

मिथुन:- मोठे आर्थिक लाभ होतील. अकल्पित सुखद घटना घडतील. वेळेचा सदुपयोग कराल.

कर्क:- समाजाचे नेतृत्व कराल. चांगले काम उभे राहील. धन धान्य वाढेल. नोकरीत उत्तम कामकाज घडेल.

सिंह:- अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. हातून धार्मिक कार्य घडेल. वैज्ञानिक कार्यक्रमात भाग घ्याल.

कन्या:- अजूनही फारशी अनुकूलता नाही. मित्र मंडळी भेटतील. मनापासून खर्च कराल. अप्रिय बातमी समजू शकते.

तुळ:- उत्तम दिवस आहे. वेळ ‘न’ दवडता कामाला लागा. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

वृश्चिक:- कर्म स्थानात चंद्र आहे. केलेल्या कर्माचे आज चांगले फळ मिळणार आहे. जुने कौटुंबिक वाद मिटतील.

धनु:- भाग्योदय होतो आहे. अनेक नवीन संधी चालून येतील. नोकरीत बदल संभवतात. उच्च स्थानी जाल.

मकर:– संमिश्र दिवस आहे. नात्यातून मोठे लाभ होतील. एकत्र कुटुंबात सुखद घटना घडतील.

कुंभ:- लेखकांना यश लाभेल. कला प्रांतात चमक दाखवाल. आयुष्याचा अर्थ समजेल. अंतर्मुख व्हाल.

मीन:- उचित घटना घडतील. अडथळे दूर होतील. वक्तृत्व चमकेल. घरातील जेष्ठ व्यक्तींची सेवा करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.