आजचे राशिभविष्य मंगळवार,२१ नोव्हेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक शुक्ल नवमी. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस”*कुषमंड नवमी* 
नक्षत्र – शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल चंद्र गुरुषी लाभयोग करत आहे. सर्वार्थ उत्तम दिवस आहे. प्रवासात मात्र काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम सहकार्य लाभेल. कामाला गती प्राप्त होईल. दैदिप्यमान यश लाभेल.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वाहन चालवताना काळजी घ्या. अनुकूल गुरू सर्व सुखे बहाल करेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धन प्रतिकूल दिवस आहे. विनाकारण भटकंती होईल. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जेष्ठ व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रश्न सुटतील. सिद्धी प्राप्त होईल. सत्संग घडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस आहे. स्त्रीधन वाढेल. भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दीर्घकालीन परिणाम करणाच्या घटना घडतील. अर्थकारण वेगवान होईल. शब्द जपून वापरा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शेती कामात वेळ द्यावा लागेल. जमीन विक्रीतून लाभ होतील. पशूंपासून काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक वाढणार आहे. नात्यातून मदत मिळेल. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सखोल अभ्यास घडेल. वक्तृत्व चमकेल. छोटी सहल घडेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. मेजवानी मिळेल. लेखनातून आनंद मिळेल. कामाचा ताण वाढेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आध्यत्मिक लाभाचा दिवस आहे. आत्मचिंतन कराल. सत्संग घडेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!