आजचे राशिभविष्य शुक्रवार,२९ डिसेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया/तृतीया. हेमंत ऋतू, उत्तरायण, शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००आज वैधरुती वर्ज्य दिवस
चंद्र नक्षत्र – पुष्य.  आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) फारशी अनुकूलता नाही. माता – पित्यांशी वाद टाळा. अधार्मिक कृत्ये हातून घडणार नाहीत याची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी विनाकारण खर्च वाढेल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे. विनाकारण कोणाबद्दलही मनात अढी ठेवू
नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) शत्रू शिरजोर होण्याची शक्यता आहे. सरकारी कामातून त्रास संभवतो. अनुकूल गुरू योग्य मार्ग दाखवेन.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आवडत्या छंदात मन रमेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चोरीचे भय आहे. नोकरीत अनुशासन महत्वाचे आहे.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. आज महत्वाची कामे नकोत. योग्य सल्ल्याशिवाय पॉल उचलू नये.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. संस्कार – दीक्षा घेण्यास चांगला कालावधी आहे. धार्मिक कार्यास हातभार लावाल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रसिद्धीची हवं धरू नये. त्यातून अनर्थ घडू शकतो. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. नोकराकडून त्रास संभवतो.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. स्व- जनाचा विरोध सहन करावा लागू शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. अति आत्मविश्वास अडचणीचा ठरू शकतो. प्रतिष्ठा पणास लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कौटुंबिक कलह टाळा. संततीशी मतभेद संभवतात. पत्नीचे सहकार्य लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुने मित्र भेटतील. औषधांशी संबंध येईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दशम स्थानी रवी आहे. चंद्राशी अशुभ योग आहे. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. सरकारी कामात दिरंगाई नको.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!