आजचे राशिभविष्य शुक्रवार,२६ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण षष्ठी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे. 
चंद्र नक्षत्र – उ. भा./ रेवती.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. आज काम होतील.आर्थिक तरतूद होईल. कर्ज पाहिजे असल्यास मिळेल. खर्च देखील वाढेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. लाभ स्थानात चंद्र आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. उत्तम अनुभव येतील. मन प्रसन्न राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. व्यापारात लाभ होतील. वाहन सुख मिळेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गुरू सान्निध्य लाभेल. गूढ अनुभव येतील. आर्थिक आवक मनासारखी होईल. प्रवास कार्यसाधक होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र ग्रहमान आहे. प्रगतीची दारे उघडतील. प्रशासकीय कामे मार्गी लागतील. सन्मान मिळतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक गणिते जुळून येतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चांगला दिवस आहे. आर्थिक आवक चांगली असणार आहे. भिन्न लिंगी व्यक्तीकडून फायदा होईल. प्रवास घडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  ग्रहमान अनुकूल आहे. योग्य निर्णय घ्याल. व्यापारातून आणि शेअर्स मधून लाभ होतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भौतिक सुखे आणि पारमार्थिक सुखे यात मन दोलायमान होईल. गूढ अनुभव येतील. जलविहार कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहमान आहे. जवळच्या व्यक्तीची काळजी घ्या ,अर्थलाभ होईल. नवीन व्यावसायिक माहिती मिळाल्याने उत्साह वाढेल.संतती कडून खुश खबर मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय स्थानी चंद्र आहे. कौटुंबिक पेचप्रसंग सुटतील. सामाजिक कार्य घडेल. स्तुती होईल. दबदबा वाढेल. व्यसने टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीतील चंद्राचा गुरू आणि शुक्राशी शुभ योग आहे. उत्तम अनुभव येतील. मन आनंदी राहील. मेजवानी मिळेल. दानधर्म करा. देणी फेडून टाका.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.