आजचे राशिभविष्य शुक्रवार,१४ जून २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल अष्टमी.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे. *दुर्गाष्टमी* 
चंद्र नक्षत्र – उत्तरा फाल्गुना.  आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह/ (सकाळी ११.५५ नंतर) कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक काम करा. सरकारी नियम काटेकोर पाळा. हाताची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्याच राशीत रवी, बुध, शुक्र आहेत. मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. नवीन योजना साकार होतील. घरात शांतता राखावी.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तीन ग्रहण व्यय स्थानात आहेत. कामाचे नियोजन बदलेल. संतती बाबत चिंता वाटेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. जरी चंद्राशी शुभ योग नसला तरी प्रगती होईल. घोडदौड चालू राहील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक भरभराट होईल. येणी वसूल होतील. व्यवसायात यश मिळेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धनलाभ होईल. उत्तम यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. कलाकारांना यश मिळेल. लक्ष्मी प्राप्ती होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  धाडसी निर्णय घ्याल. अहंकार वाढल्यास नुकसान होऊ शकते. घरगुती वादात माघार घ्या. कायदे पालन करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) घरासाठी खर्च कराल. काही मोठे बदल संभवतात. शुभ कार्य ठरेल. काटकसर कराल. प्रिय व्यक्ती भेटेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमच्या स्वभावाला साजेसे ग्रहमान आहे. आर्थिक प्रगतीची घोडदौड चालू राहील. राजकीय यश लाभेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सौख्य लाभेल. खर्चात वाढ होईल. अपेक्षित लाभ कदाचित मिळणार नाहीत. मात्र संयम ठेवावा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भाग्योदय होईल. व्यवहारी भूमिका घ्याल. फायदा होईल. हातून कोण दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.