आजचे राशिभविष्य रविवार,२० ऑक्टोबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन कृष्ण तृतीया/चतुर्थी. शरद ऋतू.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस/क्षय तिथी आहे” *संकष्टी चतुर्थी. चंद्र उदय (मुंबई) ८.३४. नाशिक – ८.२८    
चंद्रनक्षत्र – कृतिका(सूर्य)/रोहिणी (चंद्र). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सन्मान मिळतील. आध्यात्मिक लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीत चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. नोकरीत काहीसा तणाव जाणवेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. प्रवासचे नियोजन बदलेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. शनीची नाराजी जाणवेल. श्री. हनुमान उपासना करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. कनिष्ठ मात्र नाराज राहतील.पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सिद्धी प्राप्त होतील. लक्ष्मीची कृपा राहील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. मात्र येणी येण्यास विलंब लागेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. भलते धाडस नको. आर्थिक लाभ होतील.  खर्च सुद्धा वाढेल. वाहन जपून चालवा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  दबदबा वाढेल. सामाजिक कार्य  कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल. विक्री क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. .प्रगतीत काही अडथळे जाणवतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. प्रवास घडतील. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. आनंद देणाऱ्या घटना घडतील

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.