आजचे राशिभविष्य सोमवार,२६ ऑगस्ट २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू.  
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे.” *श्रीकृष्ण जयंती* कालाष्टमी.
चंद्र नक्षत्र – कृतिका/(दुपारी ३.५५ नंतर) रोहिणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ. (व्याघात योग शांती करून घ्यावी)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:- कौटुंबिक सुख मिळेल. मात्र त्यासाठी संततीशी सुसंवाद साधला पाहिजे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. राजकीय त्रास जाणवेल.

वृषभ:- सूर्याच्या नक्षत्रात चंद्र आहे. नेतृत्वगुण उफाळून येईन मात्र सामाजिक कार्यात झोकून देताना विचार करा. गुप्त शत्रू निर्माण होतात. अनुकूल नेपच्यून सुखाची बरसात करेन.

मिथुन:- व्यय स्थानी चंद्र आहे. तिसरा सूर्य आहे. आई वडिलांची सेवा करा. सौख्य मिळेल. तुम्ही पराक्रमी आहेत मात्र आज भलत्या जागी शौर्य दाखवू नये.

कर्क:- चंद्र अनुकूल आहे. त्याचा नेपच्यूनशी शुभयोग आहे. आनंददायक सहलीचा योग येईन. काव्य आणि विनोद यात रंगून जाल.

सिंह:-  तुमचा राशीस्वामी तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. आज तुम्ही खूप कष्ट कराल. तरीही वरिष्ठांची नाराजी राहू शकते.

कन्या:- राजकीय किंवा सरकारी कामांसाठी आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. खर्च वाढतील.

तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. सूर्य अनुकूल असले तरी चंद्राचा केंद्र योग आहे. मित्र मंडळी भेटतील. धनलाभ होईल. काही अपेक्षा अपूर्ण राहतील.

वृश्चिक:– नवनवीन ओळखी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पत्नीसाठी वेळ द्याल. जे काही प्राप्त करायचे होते ते आज साध्य होईल.

धनु:- भांडण तंटे असल्यास मिटतील. आरोग्याबाबत सजग व्हाल. व्यायामाचे महत्व पटेल. आर्थिक लाभ होतील. अपेक्षा पूर्ण होतील.

मकर:- कितीही नियोजन केले तरी ते आज बदलणार आहे. मन अस्वस्थ ठेवणारा कालावधी आहे. सूर्य देवाची उपासना करा. दमा आणि खोकला यांचा त्रास होऊ शकतो.

कुंभ:- विनाकारण आळस आल्यासारखे वाटेल. घरगुती किंवा वाहन दुरुस्तीची कामे निघू शकतील. अडचणीतून मार्ग निघतील.

मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. यशश्री प्राप्त होईल. मौज कराल. व्यसने टाळा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
WhatsApp Group