भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर अंतराळ स्थानकात अडकले आहेत.5 जून रोजी रोजी हे दोन्ही अंतराळवीर अंतराळत झेपावले होते. ते बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. स्पेसक्राफ्टमध्ये आलेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे स्टारलाईनरला पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे सुनीता आणि बुच अंतराळातच अडकले आहेत.स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याच माध्यमातून त्यांना परत आणणे अतिशय जोखीमचे ठरणार आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासा अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही की सुनीता विल्यम्स आणि बुच यांना पृथ्वीवर कसे आणावे.जर ते ISS च्या क्रू सोबत राहिले तर त्यांना २०२५ मध्येच पृथ्वीवर परत आणता येईल. जर या दोघा अंतराळवीरांना स्टारलाईनर स्पेसक्राफ्टद्वारे पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न केला गेला तर ते खूप धोकादायक ठरू शकते. वृत्तांशी संवाद साधताना अमेरिकन मिलिटरी स्पेस सिस्टिम्सचे माजी कमांडर रूडी रिडोल्फी यांनी तीन गंभीर परिस्थितींविषयी चर्चा केली आहे, ज्या स्टारलाईनरला पृथ्वीवर परत आणताना उद्भवू शकतात. कोणतीही छोटीशी चूक अंतराळवीरांच्या जीवनासाठी गंभीर धोका ठरू शकते.
सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांचे हे वर्ष आता अंतराळ स्थानकातच जाणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळ यानातून ते पृथ्वीवर परत येऊ शकतात. हे यान पुढील महिन्यात अंतराळ स्थानकाकडे झेपवणार आहे. या अंतराळ यात्रात चार सीट आहेत. त्यातील दोन सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी रिकामी ठेवली जाणार आहे. तसेच स्टारलाइनर विना चालक दल अंतराळ स्थानकातून वेगळा होणार आहे अन् अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतणार आहे.
स्पेसएक्सला बोइंगचा सर्वात मोठा स्पर्धेक मानले जाते. परंतु बोइंगच्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सची निवड नासाने केली. २०१६ मध्ये बोइंगने स्टारलाइनर विकसित केले होते. त्यासाठी १.६ बिलियन डॉलर लागण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च लागला आहे.