मुंबई,दि,२५ ऑगस्ट २०२४ – ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या विशेष भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला विचारणार आहे,”माचिसचं काम काय?”. उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,”काडी लावणं”. त्यावर रितेश भाऊ छोटा पुढारीला विचारतो,”बिग बॉस मराठी’च्या घरातला कोणता सदस्य आहे जो घरात आग लावायचं काम करतो?”. रितेश भाऊला उत्तर देत छोटा पुढारी म्हणतो,”माझ्या मते, माचिस मी डीपी दादाला देऊ इच्छितो.. कारण निक्की आणि माझं जे भांडण झालं ते डीपी दादांमुळे झालं होतं”. इतर सदस्य कोणतं चिन्ह कोणाला देणार हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ग्रुप A’ला मी ट्रॉफी उचलू देणार नाही; निक्की तांबोळी असं का म्हणाली ?
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख एकामागून एक धक्के देत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर ‘भाऊची चक्रव्यूह’ खोली उघडण्यात येणार आहे. यात घरातील सदस्यांना एकमेकांचे खरे रंग कळणार आहेत. भाऊच्या चक्रव्यूहात एकमेकांच्या मनातलं बाहेर येणार आहे. एकंदरीतच घरातील सदस्यांसमोर सगळं उघड होणार आहे. आजच्या भागात निक्कीसमोर तिच्या ग्रुपमधील सदस्यांचे खरे चेहरे येणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चक्रव्यूह खोलीत बसलेली दिसून येत आहे. निक्कीला तिच्या ग्रुपमधील सदस्य तिच्याबद्दल काय म्हणतात हे रितेश भाऊ दाखवतो. त्यानंतर बाहेर येऊन निक्की म्हणते,”ग्रुप A साठी मी टाळ्या वाजवत आहे. त्यांच्यात दम तर नाहीच आहे. हलके लोक आहेत हे.. ग्रुप Aला मी ट्रॉफी उचलू देणार नाही, हा माझा वादा आहे”.
निक्कीसमोर सत्य आल्यानंतर आता ती नक्की कोणाच्या बाजुने खेळणार की नवा ग्रुप निर्माण करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. निक्की आणि अभिजीत ग्रुप C बनवणार असल्याचीही चर्चा आहे. आता नक्की निक्की कसा खेळ खेळणार हे आगामी भागातच कळेल.
दुर्गाच्या रॅपिड फायरमध्ये अडकणार अभिजीत सावंत
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील आगामी ‘दुर्गा’ या मालिकेची टीम आज भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहे. दरम्यान दुर्गा मालिकेतील दुर्गा सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळणार आहे. आजच्या भागात रॅपिड फायरमध्ये दुर्गा अभिजीत सावंतला विचारते,”‘टीम B मधूल एका सदस्याला काढून टीम A मधल्या एका सदस्याला घ्यायचं असेल तर कोणाला काढाल आणि कोणाला घ्याल?”. यावर अभिजीत आर्याला काढून इरिनाला घेईल असं उत्तर देतो. “या क्षणाला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येते?”, याचं उत्तर देत अभिजीत म्हणतो,”सर्वात जास्त घराची आठवण येते”. अंकिता आणि निक्कीमध्ये सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण? यावर अभिजीत अंकिताचं नाव घेतो. तर अभिजीतच्या मते टॉप 3 सदस्य हे निक्की, अंकिता आणि अरबाज हे आहेत.