आजचे राशिभविष्य बुधवार,१० जुलै २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक १० जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल चतुर्थी/पंचमी. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे” 
नक्षत्र – मघा/पूर्वा (फाल्गुना) 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  चंद्राचा गुरुषी केंद्र योग आहे. संततीशी वाद संभवतात. शिक्षणात अडथळे जाणवतील. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आध्यात्मिक लाभ होतील. दानधर्म कराल. वास्तू संबंधीत काही प्रश्न निर्माण होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक प्रश्न सुटतील. दानधर्म करण्यास योग्य कालावधी आहे. तीर्थाटन घडेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल गुरुची परिणामकारकता आज क्षणी होईल. कौटुंबिक कामात वेळ व्यतीत होईल. कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. उद्योग व्यवसायात भरघोस वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी काहीसे उदास वाटेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. अचानक लाभ होतील. उच्च शिक्षणात निराशा होईल. प्रवास घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रूचा नायनाट होईल. एखादी पीडादायक बातमी येऊ शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सरकारी कामात लाभ मिळतील. अडचणी दूर होतील. पत्नीशी मतभिन्नता वाढू देऊ नका. चोरीचे भय आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अर्थलाभ होईल. खर्च देखील वाढेल.  लक्ष्मी प्रसन्न राहील. मात्र सामाजिक कार्यासाठी खर्च कराल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहील. येणी वसूल होतील. संततीबाबत चिंता वाटेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कुटुंबातील सदस्यांची मने जिंकावी लागतील. अंतर्मुख व्हावे लागेल. कोणालाही कमी लेखून चालणार नाही.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक उलाढाल वाढेल. लाभ  होतील. मात्र येणी देखील वाढणार आहेत. मौल्यवान खरेदी होईल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

१० जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर रवी, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आशावादी असतो. तुमच्या मध्ये आत्मविश्वास असतो आणि तुम्हाला मानसन्मान मिळतात. ठरवलेले उद्दिष्ट तुम्ही आयुष्यात पार पाडू शकतात. इतरांना तुमच्याकडून बरीच मदत होते. मात्र त्याचे श्रेय तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला वारसा हक्काने पैसा किंवा कला उपलब्ध होते. आयुष्याच्या ४६ नंतर भाग्योदय होतो. तुम्ही निर्भयपणे वावरतात. जीवनात कष्ट करण्याचे तुमचे तयारी असते. उत्तम कल्पनाशक्ती तुम्हाला लाभलेली आहे. तुमची प्रकृती अस्थिर आहे आणि तुम्हाला लहरी आणि चमत्कारिकपणा  यांचा वारंवार अनुभव येतो. तुम्ही आयुष्यात प्रगती करतात आणि यश संपादन करतात. आयुष्यात बरेचसे चमत्कारिक आणि साहस पूर्ण अनुभव येतात.

तुमच्यात जबरदस्त राष्ट्रभक्ती असते आणि घर आणि संसार याकडे तुमचा ओढा असतो. तुम्ही शांत वृत्तीचे असून एकलकोंडे आहात मात्र तरीही तुम्हाला लोकप्रियता मिळते. तुम्ही निस्वार्थी आणि प्रामाणिक असून पैसे जमवण्याकडे तुमचा कल असतो. मात्र पैशांमुळे तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्ही धार्मिक आहात. स्वतंत्र वृत्तीचे आहात. जीवनात सतत बदल करण्याची तुमची वृत्ती असते. एकाच गोष्टी तुम्ही फार काळ रमत नाहीत. तुम्ही उद्योगप्रिय असून सतत कामात मग्न असतात. तुमचा दृष्टिकोन डोळस असतो. इतरांना सल्ला देणे तुम्हाला आवडते आणि त्यात यश मिळते. तुम्ही व्यवहार दक्ष आणि ध्येयवादी असतात. तुम्हाला कलेबद्दल आकर्षण आहे. आणि तुम्ही त्यात उत्साहाने भाग घेतात. तुमची इच्छा शक्ती चांगली आहे. कोणताही विषय तुम्ही मित्रांना उत्तमपणे समजावून सांगू शकतात.
व्यवसाय:-  तुमचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे तुम्ही एकाच नोकरीत किंवा व्यवसायात फार काळ टिकत नाहीत. जाहिरात उद्योग, वर्तमानपत्रे, मासिके, चित्रपट उद्योग, नाट्यकला, रंगकाम, अंतर्गत सजावट, नेपथ्य, बँकिंग यात तुम्हाला यश मिळते.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा, सोनेरी, केशरी.
शुभ रत्न:- माणिक, चंद्रमणी. (रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.