ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण पंचमी/षष्ठी.हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – मघा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -सिंह.
“आज चांगला दिवस”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अनुकूल चंद्र रवी योग नवीन वर्षाची जोरदार सुरुवात करणार आहे. कष्टाचे फळ मिळेल. शेअर्स/लॉटरी मध्ये यश.
वृषभ:- बाग बगीचा यांत रमाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. उत्तम संवाद होईल. ओळखी वाढतील.
मिथुन:- पराक्रमी दिवस आहे. तुमचा दबदबा वाढेल. शत्रू पराभूत होतील.कोर्ट कामात यश लाभेल.
कर्क:- शब्दास मान मिळेल. सहमती लाभेल. आरोग्यात सुधारणा अपेक्षित आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह:- नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने कराल. आत्मविश्वास वाढेल. धाडसी निर्णय घ्याल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. घरात तुमच्या निर्णयाचा मान राखला जाईल. सन्मान मिळतील.
तुळ:- अतिशय उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढवा. यश मिळेल. स्वप्ने साकार होतील.
वृश्चिक:- हरवलेली कागदपत्रे प्राप्त होतील. अधिकारात वाढ होईल. राजकीय क्षेत्र गाजवाल.
धनु:- कठीण प्रश्नांवर मार्ग सापडेल. तुमचा सल्ला इतरांना मोलाचा ठरेल. दबदबा वाढेल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. भौतिक सुखे प्राप्त होतील. मौल्यवान खरेदी होईल.
कुंभ:- अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यावसायिक यश लाभेल. सन्मानित व्हाल.
मीन:-नोकरीच्या ठिकाणी लाभ होतील. मनासारखी बदली/ बढती मिळेल. वरिष्ठ खुश राहतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
