आजचे राशिभविष्य सोमवार,१५ जुलै २०२४
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक १५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल नवमी/दशमी. वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- मंगळाची हर्षलशी युती आहे. कौटुंबिक मतभेद संभवतात. कठोर बोलणे टाळा. पाळीव पशूंपासून त्रास होऊ शकतो.
वृषभ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. फार मोठे निर्णय आज नकोत. आर्थिक लाभ नेहमीप्रमाणे होतील. मन अस्थिर होईल. चुकीचे निर्णय होऊ शकतात.
मिथुन:- प्रतिकूल दिवस आहे. शेअर्स मध्ये मोठे नुकसान संभवते. खर्च वाढेल. विनाकारण गैरसमज होतील.
कर्क:- बौद्धिक क्षेत्रात पीछेहाट होऊ शकते. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. मात्र त्यातून समाधान मिळण्याची शक्यता कमी आहे.
सिंह:– आर्थिक लाभ वाढतील. पराक्रम गाजवाल. नेतृत्व कराल. नोकरीच्या ठिकाणी कटकटी संभवतात.
कन्या:– संमिश्र दिवस आहे. सांभाळून पावले टाकावीत. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवासात त्रास होऊ शकतो.
तुळ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. मात्र प्रतिकूल ग्रहमान आहे. नात्यात विसंवाद होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. भगिदरी व्यवसायात मोठे बदल होतील. क्वचित वादविवाद संभवतात. कोर्टात अपयश येऊ शकते.
धनु:- चंद्र अनुकूल आहे. काही सुखद अनुभव येतील. भावंडांशी जमवून घ्यावे लागेल. वाहन चालवताना अधिक काळजी घ्या.
मकर:- आर्थिक बाजू भक्कम होणार आहे. मात्र आर्थिक नियोजन चुकू शकते. नोकरीत अधिक अडचणी येऊ शकतात. कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील.
कुंभ:- सहाव्या बुधाशी शनीचा अशुभ योग आहे. चतुर्थ स्थानात मंगळ हर्षल युती आहे. घरात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वसाहतीत विसंवाद होईल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. नात्यात वाद होऊ शकतात. गुंतवणूक करताना दुर्लक्ष नको. हाताची काळजी घ्या.
१५ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर शुक्र, चंद्र आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला शांत असले तरी कधीही तडजोड करत नाहीत. तुम्ही अति महत्वाच्या पदांवर यशस्वी होतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी असतो. तुम्ही अनाठायी काळजी करतात. घर, संसार, मित्र यांचा बद्दल आपुलकीची नाती जोडली जातात. भाषणे, लेखन, रेडिओ कार्यक्रम यात तुम्ही रस घेतात. बढाईखोर पणा टाळला पाहिजे.
तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुमचा सहवास नेहमीच उत्साह वर्धक असतो. तुम्हाला गायन, नृत्य किंवा इतर कलांची तसेच गूढ विद्यांची आवड असते. आईबद्दल विशेष प्रेम असते तर आई कडील नातेवाईकांशी तुमचे विशेष पटते. तुम्हाला सामाजिक रूढी आणि परंपरा फारशा आवडत नाहीत. तुमची ही तारीख सौंदर्य, आरोग्य, सामर्थ्य, प्रेम, आकर्षण, आपुलकी दर्शवते. स्वभाव खर्चिक असतो. तुम्ही भावनाप्रधान आहात. तुम्हाला वारसा हक्काने किंवा विवाहाच्या निमित्ताने पैसे मिळतो. तुम्ही खर्चिक छंद जोपासतात. श्रीमंती आणि खर्च यांचा ताळमेळ तुम्ही व्यवस्थित घालतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. ज्याचे आकर्षण वाटते त्यावर पैसे खर्च करण्यास तुम्ही मागे पुढे बघत नाहीत.
व्यवसाय:- जमीन खरेदी विक्री, एजंट, शेअर ब्रोकर, आर्किटेक्ट, बँकिंग, शेती, हॉटेल मॅनेजर, मिठाई, संगीत.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)