आजचे राशिभविष्य मंगळवार,१६ जुलै २०२४ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल दशमी/एकादशी.क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – दुपारी ३ ते ४.३० 
“आज (विशाखा) वर्ज्य  दिवस आहे” 
चंद्रनक्षत्र – विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ/ (संध्याकाळी ७.५२ नंतर) वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा सूर्य आणि शनीशी शुभ योग् आहे.मन प्रसन्न राहील.प्रिय व्यक्तीची भेट होईल.पराक्रम गाजवाल.संध्याकाळी वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे.नोकरीत चांगले अनुभव येतील.समाजकार्य कराल.मात्र पत्नीशी मतभेद संभवतात.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्या राशीतील सूर्याशी चंद्राचा शुभ योग आहे. शेअर्स मधून नफा मिळवाल.नेतृत्व कराल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  अचानक लाभ होतील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. जमिनीचे व्यवहार होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन प्रसन्न राहील. अनुकूल रवी सरकारी मान सन्मान तसेच सरकारी नोकरीचे योग देईन.आहे त्या नोकरीत मात्र काही गैरसमज निर्माण होऊ शकतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगले ग्रहमान आहे. महत्वाचे निर्णय आज घ्या. संध्याकाळी प्रवास टाळावेत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज दिवसभर तुमच्या राशीत चंद्र आहे. अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. मात्र वाहन जपून चालवा. सावधानता बाळगा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  प्रतिकूल दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव वाढेल. पत्नीशी मतभेद संभवतात. संध्याकाळ काहीशी दिलासा देणारी.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दशम स्थानी चंद्र आहे. नोकरीत उत्तम कामाचे कौतुक होईल. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. अति धाडस नको.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रवास कार्यसाधक होतील. येणी वसूल होतील. पंचम रवी साहस आणि धैर्य देईन. संध्याकाळ सामाजिक त्रासातून कटकटी निर्माण करणारी ठरू शकते.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूलता नाही. अष्टम चंद्र मनाची चलबिचल करेल. दानधर्म करण्यास अत्यंत अनुकूल दिवस आहे. आध्यत्मिक लाभ होतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!