ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल त्रयोदशी. शरद ऋतू. क्रोधी नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा/ शततारका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
“आज उत्तम दिवस आहे.” सूर्याचा कन्या राशीत प्रवेश.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- अनुकूल चंद्राचा मंगळाशी शुभयोग आहे. तुमचा दबदबा वाढेल. अधिकार वाढतील. स्वप्ने साकार होतील. कोर्टात यश मिळेल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या भेटी गाठी होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. बोलताना काळजी घ्या.
मिथुन:- अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासातून चांगले अनुभव येतील. सिद्धी प्राप्त होतील. मात्र अचानक खर्च वाढू शकतात.
कर्क:– अष्टम स्थानी चंद्र आहे. त्याचा हर्षलशी केंद्र योग आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मात्र आर्थिक नियोजन करा.
सिंह:– आर्थिक लाभ होतील. मोठी झेप घ्याल. व्यवसाय वाढेल. ग्रहमान अनुकूल आहे. शत्रू पराभूत होतील.
कन्या:- चांगली बातमी समजेल. नोकरी/व्यवसायात यश मिळेल. अधिकार वाढतील. भरभराट होईल. प्रवासात मात्र त्रास होऊ शकतो.
तुळ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सुखद अनुभव येतील. छोटे प्रवास घडतील. घरगुती समारंभ होईल.
वृश्चिक:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्र भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जमीन/शेती यातून लाभ होतील.
धनु:- अनुकूल ग्रहमान आहे. नात्यातून सहकार्य मिळेल. दिवस अधिक लाभाचा आहे. मन प्रसन्न राहील. आरोग्य सांभाळा.
मकर:- प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. संतती ची काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको.
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. पंचम मंगळाशी चंद्राचा त्रिकोण योग आहे. देवभक्ती वाढेल. विद्या प्राप्त होतील. उपासना लाभदायक ठरेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. सामाजिक कार्यातून उत्तम लाभ होतील. नवीन ओळखी होतील. दुरदर्शीपणा दाखवाल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)