ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण अमावस्या. वर्षा ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज वर्ज्य दिवस आहे.”
*दर्श – पिठोरी अमावस्या. सोमवती अमावस्या. बैल पोळा.* श्रावणी सोमवार. शिवामूठ – सातू.
चंद्र नक्षत्र – मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. मोठे करार आज नकोत.
वृषभ:– चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे. सामाजिक काम करतांना अप्रिय अनुभव येऊ शकतात. घरगुती कटकटी टाळा. आराम करा.
मिथुन:- तृतीय स्थानी चंद्र आहे. तिसरा सूर्य आहे. भावंड मदत करतील. पराक्रम गाजवाल. हातांची काळजी घ्या.
कर्क:- फारसा आशादायक दिवस नाही. कौटुंबिक कलह होऊ शकतात. घशाची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.
सिंह:– तुमचा राशीस्वामी तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. राजकीय भाष्य टाळा.
कन्या:- आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील.
तुळ:– लाभ स्थानात चंद्र आहे. सूर्य अनुकूल असले तरीही फारसा दिलासा मिळू शकणार नाही. काटेकोर नियोजन करा.
वृश्चिक:- कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. वरिष्ठ खुश होतील.
धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील.
मकर:– सध्या ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाची कामे आज टाळावीत. गुंतवणूक करू नका. विचारपूर्वक कृती करा.
कुंभ:- सप्तम चंद्र पत्नीची उत्तम साथ मिळवून देईन. गुप्त शत्रूचा त्रास मात्र वाढेल. कोर्ट कामात दिरंगाई होईल.
मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विरोधक पराभूत होतील.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)