आजचे राशिभविष्य शनिवार,१० ऑगस्ट २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल षष्ठी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे” *श्रियाळ षष्ठी, सुपोदन – वर्णषष्ठी* पिंपळ, शनी मारुती पूजन. 
नक्षत्र: चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या/ (दुपारी ४.१८ नंतर) तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात संथ आहे. खर्च वाढतील. मन अस्वस्थ राहील. घरगुती वादविवाद संभवतात. उत्तरार्ध अनुकूल आहे.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दूरचे प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. उत्तरार्ध दिलासा देणारा आहे.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) बोलताना काळजी घ्या. कोणासही जामीन राहू नका. नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वास असणे चांगले असले तरी तो अति नको. सरकारी नियमाचे काटेकोर पालन करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दिवस सर्वसाधारण आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. आरोग्यचे प्रश्न निर्माण होतील. पित्याशी मतभेद संभवतात.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  कामाचे नियोजन बदलेल. संयम ठेवावा लागेल. नवीन संधी चालून येतील. आरोग्य तपासणी करणे हिताचे ठरेल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  सुरुवात फारशी अनुकूल नाही. मात्र दुपार नंतर काही चांगल्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) काहीसा अनुकूल दिवस आहे. अष्टम रवीचा शनिशी अशुभ योग आहे. सामाजिक कार्यातून विनाकारण त्रास होऊ शकतो. राजकीय भाष्य टाळा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. सुरुवात फारशी वेगवान नसली तरी उत्तरार्ध अनुकूल आहे. एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो. जेष्ठ व्यक्तीची काळजी
घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सांभाळून वाटचाल करा. शत्रू शिरजोर होणार आहे. प्रशासकीय कामे रेंगाळतील. श्री. हनुमान उपासना करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विजयी घोडदौड चालू राहील. अभ्यासात यश मिळेल. प्रवास घडतील. नियोजन बदलेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) दिवसाची सुरुवात आशादायक आहे. कामे मार्गी लागतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. उत्तरार्ध चिंता वाढवणारा असू शकतो.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.